Latest News
Typography

Directed and written by Bhanudas Bhagwan Vyavhare, Marathi Film 'Tula Pan Bashing Bandhaychay' launched it's music in the presence of cast and crew members on 7th March in Mumbai. The event was attended by artists Shweta Kharat, Ritesh Nagrale, Harshi Sharma, Arjun Jadhav, Rahul Patil, Akash along with director & producer Bhanudas Bhagwan Vyavhare and music director Agnel Roman. Also present were the co-producers of the film.

The film 'Tula Pan Bashing Bandhaychay' is ready to release on 30th March 2018.

Watch the Video of the Cast Interview

‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा

वयात आलेल्या मुला-मुलीचं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच महत्त्वाचा असतो. त्या अपेक्षांच्या आणि परंपरेच्या जोखडातून मुलीच्या लग्नाचं कर्तव्य पार पाडायचे असते. ‘जयलक्ष्मी वैष्णवी फिल्म प्रोडक्शन’ यांची प्रस्तुती असलेल्या ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ या आगामी मराठी चित्रपटातून लग्नाच्या अनेक सामाजिक प्रश्नांचा वेध घेण्यात आला आहे. या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच सहाय्यक राज्यकर आयुक्त अन्वेषणचे श्री. चेतन भिंगारे यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाची निर्मिती भानुदास व्यवहारे व दत्तात्रेय मोहिते यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी भानुदास व्यवहारे यांनीच सांभाळली आहे. ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ हा चित्रपट ३० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ग्रामविकास व महिला बाल विकास मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांनी या चित्रपटाला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

हा चित्रपट व गीते प्रेक्षकांना नक्कीच आवडतील असा विश्वास निर्माते व दिग्दर्शक भानुदास व्यवहारे यांनी व्यक्त केला. या वेगवेगळ्या धाटणीची ५ गीते या चित्रपटात आहेत. भानुदास व्यवहारे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीतांना संगीतकार एँग्नेल रोमन यांचा संगीतसाज लाभला आहे. वैशाली माडे, सुहास सावंत, प्रसन्नजित कोसंबी यांनी यातील गीते गायली आहेत. संगीत संयोजन विलास गुरव यांचे आहे.

वैवाहिक आयुष्यातील समस्या, मुला-मुलींच्या अपेक्षा, त्यांच्या आई-वडिलांचे दृष्टिकोन या सगळ्यांवर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. विक्रम गोखले, सुरेश विश्वकर्मा, यतिन कार्येकर, सुनील गोडबोले, भक्ती चव्हाण, श्वेता खरात, सुवर्णा काळे,रितेश नगराले, राहुल पाटील, हर्षा शर्मा, अर्जुन जाधव, शंकर सूर्यवंशी हे कलाकार या चित्रपटात आहेत.चित्रपटाचे सहनिर्माते अभय भंडारी, प्रमोद वेदपाठक, सुभाष चव्हाण, औदुंबर व्यवहारे यांचे असून सहदिग्दर्शन निशांत आडगळे यांनी केले आहे. कथा,पटकथा,सवांद भानुदास व्यवहारे यांचे आहेत. छायांकन सिद्धेश मोरे यांनी तर संकलन माधव शिरसाट यांचे आहे. ध्वनीमुद्रण कीर्ती पांचाळ यांचे असून ध्वनी आरेखन प्रमोद चांदोरकर यांनी केले आहे. रंगभूषा- वेशभूषा विजय मगरे यांची आहे.

‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ ३० मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Photos

Director & Producer Bhanudas Bhagwan Vyavhare

Tula Pan Bashing Bandhaychay Music Launch 01

Music Director Agnel Roman

Tula Pan Bashing Bandhaychay Music Launch 02

Welcoming Chief Guest

Tula Pan Bashing Bandhaychay Music Launch 03

Music Launch - Complete Cast & Crew

Tula Pan Bashing Bandhaychay Music Launch 04

Music Launch - Cast, Music Director, Director & Producers

Tula Pan Bashing Bandhaychay Music Launch 05

Music Launch - cast L-R -Harshi Sharma, Shweta Kharat, Arjun Jadhav, Ritesh Nagrale, Rahul Patil & Aakash

Tula Pan Bashing Bandhaychay Music Launch 06

Director & producers

Tula Pan Bashing Bandhaychay Music Launch 07

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News