Latest News
Typography

पुणे, १६ मार्च २०१८: आतापर्यंत अनेक गाजलेल्या पुस्तकांवर चित्रपट बनली आहेत, मात्र एका चित्रपटावर पुस्तक काढण्याची हि पहिलीच वेळ आहे ! द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत व चित्राक्ष फिल्म्स निर्मित ‘बबन’ या सिनेमाच्या जडणघडणीचा अखंड लेखाजोखा मांडणारे ‘मेकिंग ऑफ बबन’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. पत्रकार मंदार जोशी संपादित (तारांगण प्रकाशन) या पुस्तकाचा पुणे येथील नॅशनल फिल्म अर्काईव्हमध्ये समर नखाते यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला चित्रपट दिग्दर्शक सुजय डहाके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमास उद्योजक मा. कल्याण तावरे, मा. डाॅ. अशोक देवीकर, कवी मा. देवा झींजाड आणि सेवानिवृत्त प्राचार्य मा. विवेक जोशी हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाऊराव कऱ्हाडे लिखीत, दिग्दर्शीत २३ मार्च रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘बबन’ या सिनेमाची संपुर्ण घडण या पुस्तकामध्ये मांडण्यात आली आहे.

‘मेकिंग ऑफ बबन’ या पुस्तकात 'बबन' सिनेमातील सर्व कलाकार मंडळींचे अनुभव आणि त्यांचे निवेदन मांडण्यात आले आहे. एका ग्रामीण तरुणाच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाची कथा सर्वसामान्य प्रेक्षकांना आपलीसी करणारी आहे. या सिनेमात भाऊसाहेब शिंदे प्रमुख भूमिकेत असून, त्यासोबत गायत्री जाधव हि नवोदित अभिनेत्री झळकणार आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट 'ख्वाडा' दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि अभिनेता भाऊसाहेब शिंदे पुन्हा एकदा एकत्र येत आहे. या सिनेमाची विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड आणि भाऊसाहेब शिंदे यांनी निर्मिती केली असून बबन आणि कोमलच्या रोमांचक प्रेमकथेचा आस्वाद प्रेक्षकांना यामार्फत चाखता येणार आहे.

(L-R) Sandeep Phand, Mandar joshi, Deva Zinjad,  Ujwal Nirgudkar, Sujay Dahake, Meghraj Rajebhosale, Pramod Chaudhari, Samar Nakhate, Bhaurao Karhade, Maruti Raut

Making of Baban Book Launch

 

4.2 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.20 (5 Votes)
Advertisement