Latest News
Typography

चित्रपट पाहण्यासाठी आता चित्रपटगृहात जाण्याची गरज नाही, चित्रपट तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अॅपद्वारे पाहू शकता. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन, नेटफिल्क्स, अमेझॉन प्राईम आहेत आपल्याकडे. अर्थात हे अॅप आहेत आपल्याकडे पण मराठी चित्रपट प्रदर्शित करणारा एचसीसी नेटवर्क हा पहिलाच अॅप ठरणार आहे. चित्रपटगृहामध्ये चित्रपट प्रदर्शित न करता अॅपद्वारे प्रदर्शित केला जाणार आहे. या नव्या वाटचालीस मराठी पाऊल पडते पुढे असं म्हणायला काहीच हरकत नाही. प्रत्येक क्षेत्रात, टेक्नॉलॉजी पुढे पुढे जातच आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा एक पाऊल पुढे गेली आहे. लवकरच एचसीसी नेटवर्क ’लव लफडे’ हा चित्रपट अॅपद्वारे प्रदर्शित करणार आहे.

मराठी चित्रपटांना खूप चांगले दिवस आले आहेत. त्याचं उत्तम उदाहरण सैराट, नटरंग, नुकताच आलेला बाप माणूस, गुलाबजाम असे चित्रपट होय. नवीन आलेल्या आणि येणाऱ्या चित्रपटांचा आशय खूप चांगला असतो. प्रत्येक विषय नाविन्यपूर्ण असतात. उत्तम अभिनयाने नटलेले चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकीत होताना दिसतात. एक खंत मनात नेहमी असते की हे सर्व चित्रपट सर्वच प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकत नाहीत त्याचे मुख्य कारण म्हणजे वेळ आणि पैसा.

तत्रंज्ञानाच्या व स्पर्धेच्या युगात प्रत्येकाने आपले ध्येय गाठण्याकरीता झगडावे लागत आहे. त्यात स्वतःकरीता व कुटुंबाकरिता मनोरंजनासाठी वेळच देता येत नाही. त्यामुळे केवळ २% पेक्षा कमी लोकचं मराठी चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन बघतात. या समस्येवर मात करण्यासाठी सदानंद इप्पाकायल यांनी एचसीसी नेटवर्क ही कंपनी स्थापन केली. त्याअंतर्गत मराठी सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी एचसीसी नेटवर्क अॅप तयार केले आहे. एचसीसी नेटवर्क म्हणजे होम सिनेमा कॅन्सेप्ट नेटवर्क. वर्षातून चार ते पाच चित्रपट प्रदर्शित या व्यासपीठावर करण्याचा त्यांचा मानस आहे. चित्रपट पाहण्याचा कालावधी हा तीन महिन्याचा असेल असे अॅपचे निर्मिती करणारे सदानंद इप्पाकायल सांगतात.

प्रेम म्हटलं की प्रेमाच्या अनुषंगाने ज्या काही घडामोडी, गंमतीजमती घडतात त्याचं चित्रण म्हणजे ‘लव्ह-लफडे’. सचिन आंबात यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपट लेखन संजय मोरे यांचे आहे. सलग मोशन पिक्चर्सच्या गीता कुलकर्णी आणि सॅक्रेड बुद्धा क्रिएशनचे सुमेध गायकवाड यांची संयुक्त निर्मिती आहे. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव हे नवीन चेहरे तर अभिनेता सुमेध गायकवाड आणि अभिनेत्री मोनिका दबडे मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटात समीर चौघुले, नयन जाधव, अवधूत वाडकर, संजय मोरे, कल्पेश सातपुते व कुणाल शिंदे आदी कलाकार दिसणार आहेत.

दादासाहेब फाळकेंनी एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला. त्यांचा वारसा सांगणारे मराठी कलाकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने चित्रपट प्रदर्शित करु पाहत आहेत ही मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद बाब ठरावी.

Love Lafde Marathi Film 01

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement