Latest News
Typography

दर्जेदार कथानक आणि उत्कृष्ट दिग्दर्शनातून साकार झालेल्या कलाकृतींचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवामध्ये यंदा 'असेही एकदा व्हावे' या सिनेमाला एकूण ६ नामांकने मिळाली आहेत. सालाबादप्रमाणे यावर्षी होत असलेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवामध्ये झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित 'असेही एकदा व्हावे' हा सुश्रुत भागवत दिग्दर्शित सिनेमा अंतिम फेरीत दाखल झाला आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन मिळाले असून, अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनादेखील सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचे नामांकन देण्यात आले आहे. शिवाय सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शर्वाणी पिल्लई, सर्वोत्कृष्ट गीतकार वैभव जोशी आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका सावनी शेंडे यांनादेखील पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे.


६ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला अल्पावधीतच मोठी प्रसिद्धी मिळत असून, सिनेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सिनेमाचे मधुकर रहाणे निर्माते असून, त्यांना रवींद्र शिंगणे यांची बहुमूल्य साथ लाभली आहे. सुश्रुत भागवत - शर्वाणी पिल्लई कथा पटकथा लिखित या सिनेमात उमेश तेजश्रीबरोबर शर्वाणी पिल्लई, डॉ. निखील राजेशिर्के, चिराग पाटील, कविता लाड, अजित भुरे आणि नारायण जाधव या कलाकारांचीदेखील भूमिका आहे.

Asehi Ekada Vhave State Film Awards 01

Asehi Ekada Vhave State Film Awards 02

Asehi Ekada Vhave State Film Awards 03

Asehi Ekada Vhave State Film Awards 04

Asehi Ekada Vhave State Film Awards 05

Asehi Ekada Vhave State Film Awards 06

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement