Latest News
Typography

४०० व्या प्रयोगाचे वेध लागलेल्या अभिनय कट्टयावर नुकताच ३७१ वा प्रयोग दिमाखात पार पडला. ह्या कट्टयाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे आगामी मराठी सिनेमा "मंत्र" ह्या सिनेमाची टीम. सदर कार्यक्रमात "मंत्र" या सिनेमाविषयी दिलखुलास गप्पा मारण्यात आल्या. सिनेमा मधील सौरभ गोगटे, दीप्ती देवी, पुष्कराज चिरपुटकर ही कलाकार मंडळी प्रेक्षकासोबत गप्पा मारायला उपस्थित होते. ह्या वेळी घडलेल्या परिसंवादामध्ये सिनेमाचा प्रवास कसा घडला याची उकल ह्या सर्व कलाकारांकडून केली गेली. या वेळी कट्टयावर सिनेमातील कलाकारांच्या उपस्थितीत सिनेमाचा ट्रेलर सुद्धा दाखवण्यात आला. एक आगळा वेगळा विषय घेऊन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे प्रतिपादन या कलाकारांनी केले.

सिनेमा मधील प्रमुख पात्र साकारणारे कलाकार सौरभ गोगटे यांनी आपले कास्टिंग कसे झाले आणि ऐकून प्रवास सर्वांसमोर मांडला. सिनेमाचे नावच मंत्र असल्यामुळे त्या अनुषंगे आपल्या वाट्याला आलेल्या मंत्राची तयारी कशी केली हे सौरभ यांनी आवर्जून सांगितले. मला सासू हवी मालिका फेम दीप्ती देवी यांनी सुद्धा सिनेमाविषयी गप्पा मारताना दोन विरोधी विचारांचा उत्तम द्वंद्व आपल्याला मंत्र द्वारे पहायला मिळेल असे नमूद करत येत्या १३ तारखेला सर्वांनी आवर्जून सिनेमा गृहात गर्दी करण्याचे आव्हान उपस्थितांना केले. तर दिल दोस्ती दुनियादारी द्वारे लोकांच्या मनात घर केलेला आशु म्हणजे पुष्कराज चिरपुटकरयांनी आपल्या अनोख्या शैलीत सर्वांना 'मंत्र' जाप दिला.

Mantr Marathi Film on Abhinay Katta 02

‎उपस्थित रसिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मंत्र सिनेमा म्हणजे पौराहित्य ह्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आलेली कथा. असे सूचक अर्थ त्यांनी सांगितला.सरते शेवटी कट्ट्याचे अध्यक्ष किरण नाकती यांनी उपस्थित रसिकांशी संवाद साधला सदर कट्ट्याचे निवेदन आणि परिसंवादाची जबाबदारी संकेत देशपांडे यांनी पार पाडली.

‎प्राथमिक सदरात प्रथेप्रमाणे कट्ट्याची सुरुवात प्रार्थनेने झाली. ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी लक्ष्मी नाकती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर एकपात्री सादरीकरणाला सुरुवात झाली.ज्यामध्ये अभिषेक सावळकर,गणेश गायकवाड,स्वप्नील माने,अनिकेत शिंदे,वैभव चव्हाण या कलाकारांनी विविध गाजलेल्या नाटकांतील नाट्यछटा सादर केल्या.

Mantr Marathi Film on Abhinay Katta 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement