Latest News
Typography

'सूर नवा ध्यास नवा' या रिअॅलिटी शोमधून नावारूपास आलेला प्रसनजीत कोसंबी लवकरच 'वाघेऱ्या' या आगामी सिनेमाद्वारे पार्श्वगायकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. रिअॅलिटी शोच्या मंचावरील प्रसनजीतच्या बहारदार गाण्यावर खुश होऊन, परीक्षक अवधुत गुप्तेने 'माझ्या पुढील चित्रपटात तू पार्श्वगायक म्हणून झळकशील!' असे त्याला वचन दिले होते, आणि हेच वचन पूर्ण करत अवधुतने येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या 'वाघेऱ्या' सिनेमाचे, प्रमोशनल सॉंग प्रसनजीतकडून गाऊन घेतले. आजीवासन स्टुडियोमध्ये नुकतेच हे गाणे प्रसनजीतच्या आवाजात रेकाॅर्ड करण्यात आले.

समीर आशा पाटील दिग्दर्शित आणि लिखित 'वाघेऱ्या' सिनेमाचे हे प्रमोशनल सॉंग खुद्द दिग्दर्शकानेच लिहिले असून, या गाण्याला अवधूत गुप्तेने संगीत दिले आहे. ग्रामीण विनोदावर आधारित असलेल्या या सिनेमासाठी प्रमोशनल गाणं करण्याची संधी जेव्हा अवधूतला मिळाली तेव्हा, त्याला प्रसनजीतला दिलेलं वचन आठवलं. तेव्हा त्याने प्रास्तूतकर्ते ‘सुप्रीम मोशन पिक्चर्स’चे राजेंद्र शिंदे यांना हे गाणं प्रसनजीतकडूनच गाऊन घेण्याची आग्रहाची विनंती केली. त्याच्या या विनंतीचा मान राखत चित्रपटाच्या संपूर्ण टीमने या वचनपूर्तीमध्ये आपला सहभाग दर्शविला.

याबद्दल बोलताना प्रसेनजीत कोसंबी म्हणाला, “सूर नवा ध्यास नवा हा कार्यक्रम नुकताच संपला आहे. पण, मला या कार्यक्रमातील स्पर्धक मित्र, कॅप्टनस या सगळ्यांची आठवण अजूनही येते. खूपच छान अनुभव होता या कार्यक्रमादरम्यानचा. या कार्यक्रमाने मला एक नवी ओळख दिली. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमा दरम्यान आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अवधूत दादाने मला सांगितलं होतं कि, मी तुला नक्की गाण्याची संधी देईन. आणि आता कार्यक्रम संपून फक्त एकच महिना होतो आहे आणि मला त्याने त्याच्या चित्रपटामध्ये गाण्याची संधी दिली. या निमित्ताने मला अवधूत गुप्ते यांच्यासोबत गाणे गाण्याची संधी मिळत आहे याचा खूप आनंद होत आहे."

गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या या धम्माल विनोदीपटात किशोर कदम, भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम हे मातब्बर कलाकार झळकणार असून. उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांना हास्याची चटकदार मेजवानी देण्यास येत असलेल्या या सिनेमातील हे प्रमोशनल सॉंग प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाका उडवणारा आहे.

(L-R) Sachin Sapre, Ketan Madiwale, Rajendra Shinde, Rahul Shinde, Prasanjeet Kosambi, Sameer Asha Patil, Avadhoot Gupte and Shashank Kulkarni

Wagherya Song Avadhoot Prasenjeet Kosambi 02

(L-R) Prasanjeet Kosambi, Director Sameer Asha Patil and Avadhoot Gupte

Wagherya Song Avadhoot Prasenjeet Kosambi 03

Recording in-progress

Wagherya Song Avadhoot Prasenjeet Kosambi 04

Singer Prasanjeet Kosambi

Wagherya Song Avadhoot Prasenjeet Kosambi 05

Avadhoot Gupte and Prasanjeet Kosambi

Wagherya Song Avadhoot Prasenjeet Kosambi 06

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News