Latest News
Typography

कथा, निर्मिती, दिग्दर्शन, छायाचित्रण व अभिनय यात सरस असणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हमखास यशस्वी होतात. प्रत्येकजण रिलेट करू शकेल अशी कथा... तितकेच परफेक्ट दिग्दर्शन... वैभव आणि प्रार्थनाची केमिस्ट्री... सहकलाकारांची लाभलेली उत्तम साथ तसेच निर्मात्यांनी आणि प्रस्तुतकर्त्यांनी केलेल्या हटके आणि नेमक्या मार्केटिंगमुळे ‘What’s up लग्न’ या चित्रपटाने आपले यशस्वी ५० दिवस पूर्ण केले आहेत. आजकाल प्रदर्शित होणारे चित्रपट दोन तीन आठवडे चालतात अशावेळी ‘What’s up लग्न’ जेव्हा ५० दिवस पूर्ण करतो तेव्हा ती प्रेक्षकांनी दिलेली पोचपावतीच म्हणायला हवी.

चित्रपटाचा फ्रेश लुक, हलकी-फुलकी प्रेमकथा, नयनरम्य लोकेशन्स आणि आजच्या काळात सर्व जोडप्यांना लागू पडेल असा मार्मिक संदेश या सगळ्या युएसपीमुळे ‘What’s up लग्न’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी आपल्या पदार्पणातच ‘What’s up लग्न’ या चित्रपटातून आजच्या तरुणाईची मानसिकता, लग्न संस्काराविषयीचे मत, त्या विषयीचे विचार अतिशय तरलतेने मांडण्याचा प्रयत्न केला असून, तो प्रेक्षकांना खूपच भावत आहे. १६ मार्चला रिलीज झालेल्या या चित्रपटाला सलग आठव्या आठवड्यातसुद्धा प्रेक्षकांची दाद मिळत असून वितरक राहुल हकसर आणि त्यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य यामागे आहे.

जाई जोशी व व्हिडीओ पॅलेस यांची प्रस्तुती असणाऱ्या ‘What’s up लग्न’ या चित्रपटाने कथेपासून ते अगदी प्रसिद्धीपर्यंत दाखवलेल्या हटके प्रयत्नांमुळे या चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरु आहे. या चित्रपटात वैभव, प्रार्थना, विक्रम गोखले, वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, स्नेहा रायकर, अश्विनी कुलकर्णी, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम विनी जगताप आदी मराठीतील नामवंत कलाकारांसोबत सुनील बर्वे, सविता मालपेकर आणि जयवंत वाडकर पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत.

आजच्या काळाशी सुसंगत असणारा चित्रपट अशी भावना अनेक मान्यवरांनी बोलून दाखवली आहे.

2.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 2.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement

Latest News