Latest News
Typography

डार्विनचा सिद्धांत उलटा होणार, माणसाचं पुन्हा माकड होणार. अशी हटके पंचलाईन असलेल्या धम्म्माल बालचित्रपट ‘मंकी बात’ बद्दल सर्वांच्याच मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. दिग्दर्शक विजू माने यांची ‘मंकी बात’ हि कलाकृती लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामधली खास मेजवानी ठरणार असुन हा चित्रपट येत्या शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

बालपण म्हणजे खुशाल बागडण्याची, धम्माल मस्ती करण्याची पर्वणीच असते. त्यात उन्हाळ्याच्या सुट्टया म्हटलं की किलबिल, धम्माल मस्ती, दंगा असे माकडचाळे ओघाने आले, त्या शिवाय कोणाचेही बालपण पूर्ण होत नाही. मात्र अलीकडे इंटरनेटच्या आभासी जाळ्यात मुले अडकत चालली आहेत. यामुळेच काही वर्षापूर्वी पर्यंत लहान मुलांच्या शाळानां सुट्टया लागल्या की बालनाट्य, चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चार्ली चॅप्लिन, लॉरेल अँड हार्डी, चंपक, मोगली अशा पात्रांची मुलांना भुरळ पडलेली असायची ती आता दिसत नाही. मराठी मध्ये मागील काही वर्षात मुलांसाठी म्हणून बालचित्रपट सुद्धा आलेला नाही. ती उणीव लेखक – दिग्दर्शक विजू माने यांनी ‘मंकी बात’ मधून भरून काढल्याचे दिसते.

Click Here to Watch the Trailer

दरम्यान, परिणीता, रबने बना दि जोडी , लगे रहो मुन्ना भाई, इंग्लिश विन्ग्लीश, शामिताभ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी “मंकीबात” या बालचित्रपटासाठी विशेष माकड तयार केले आहे.

प्रोऍक्टिव्ह प्रस्तुत, निष्ठा प्रॉडक्शन्स निर्मित ‘मंकी बात’ चित्रपटाची प्रस्तुती आकाश पेंढारकर, विनोद सातव, अभय ठाकूर, प्रसाद चव्हाण, शंकर कोंडे यांची असून विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू आणि विजू माने निर्माते आहेत. चित्रपटाची कथा महेंद्र कदम आणि विजू माने यांची, गीते आणि संवाद संदीप खरे यांचे तर संगीत डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिले आहे. ‘मंकी बात’ मध्ये बालकलाकार वेदांत आपटे, पुष्कर श्रोत्री, भार्गवी चिरमुले, अवधूत गुप्ते, मंगेश देसाई, विजय कदम, नयन जाधव आदी कलाकार आहेत.

Click Image to see HD Poster

Monkey Baat Marathi Film Official Poster Small

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement