Click To Book Tickets

Latest News
Typography

स्वप्नांचा प्रवास कधी तो एकट्याचा असतो तर कधी कुणाला सोबत घेऊन. अभिनेता भूषण प्रधान सुद्धा स्वप्नांच्या प्रवासाला निघाला आहे. या प्रवासात अभिनेत्री पल्लवी पाटील त्याच्या सोबत आहे. तू तिथे असावे या आगामी मराठी सिनेमातून भूषण आणि पल्लवीची हळवी प्रेमकथा लवकरच आपल्यासमोर उलगडली जाणार आहे.

जी कुमार पाटील एंटरटेण्मेंटची प्रस्तुती असलेल्या तू तिथे असावे या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. भूषण प्रधान, पल्लवी पाटील यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा आशिष-दिपक यांची आहे. संगीत दिनेश अर्जुना तर छायांकन बाशालाल सय्यद यांचं आहे. सहनिर्माते आकाश कांडूरवार, प्रशांत ढोमणे, शरद अनिल शर्मा असून कार्यकारी निर्माते रोहितोष सरदारे आहेत.

Tu Tithe Asave Pallavi Patil Bhushan Pradhan 02

Tu Tithe Asave Pallavi Patil Bhushan Pradhan 03

5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 5.00 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement