Latest News
Typography

बालपणीच्या गोटया खेळण्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या असतील. मोबाईल विश्वात हरवलेल्या आजच्या छोटया पिढीला गोटया आणि त्यांचा खेळ कसा असतो हे कदाचित ठाऊक नसलं तरी गोटयांचा खेळ त्यांना खऱ्या अर्थाने लवकरच समजणार आहे. बालपणी जीवापाड जपत खेळलेल्या गोटयांकडे व्यावहारिक जगात केवळ ‘टाइमपास’ म्हणून पाहिलं जात असलं तरी या मानसिकतेला छेद देत गोटया हा खेळ कसा उत्तम आहे हे ‘गोटया’ या आगामी मराठी सिनेमात पहायला मिळणार आहे.

केतनभाई सोमैया प्रस्तुत, विहान प्रोडक्शन द्वारा मोशन पिक्चरची निर्मिती असलेल्या ‘गोटया’ची कथा-पटकथा-संवाद-गीतलेखन-दिग्दर्शन भगवान पाचोरे यांनी केलं आहे. जय केतनभाई सोमैया या सिनेमाचे निर्माते असून, नैनेश दावडा आणि निशांत राजानी सहनिर्माते आहेत. 'गोटया' या शीर्षकावरून या सिनेमाची कथा एखाद्या लहान मुलाभोवती गुंफण्यात आली असावी असा अंदाज लावला जाणं साहजिक असलं तरी हा सिनेमा पूर्णतः गोटया या खेळावर आधारित आहे. शीर्षकाप्रमाणेच गोटयांचा खेळच खऱ्या अर्थाने या सिनेमाचा नायकही आहे.

Click Image to See HD Poster

Gotya Marathi Film First Look Poster Small

अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या भगवान वसंतराव पाचोरे यांनी गोटयांचा खेळाला अपेक्षित मान-सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. केवळ मैदानावरच नव्हे, तर बोलीभाषेतही गोटया कायम उपेक्षितच राहिल्या आहेत. ‘गोटया खेळणं’ हा रिकामटेकड्यांचं काम... ‘गोटया खेळायला आलो’ म्हणजे टाइमपास करायला आलोय का..? या अर्थाने बोलीभाषेत आजही गोटयांचा वापर केला जातो. हे चुकीचं असून गोटया हा बुद्धी तल्लख करणारा आणि शारीरिक कौशल्य दाखवणारा खेळ असल्याचं बालपणापासून गोटयांसाठी जणू वेडे असलेल्या पाचोरे यांचं म्हणणं आहे. गोटया हा खेळाला आपल्या देशात जरी दर्जा दिला जात नसला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र या खेळाला महत्त्वाचं स्थान असून ‘गोटया’ या सिनेमात तेच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं पाचोरे म्हणतात.

ऋषिकेश वानखेडे, राजेश श्रृंगारपुरे, सयाजी शिंदे, आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, हेमांगी राव, शरद सांखला, शशांक दरणे, पोर्णिमा आहिरे, विजय साळवे, जस्सी कपूर, धनंजय वाबळे, निलेश सुर्यवंशी, नेल्सन लिआओ, कृष्णा, श्लोक देवरे, अविष्कार चाबुकस्वार, धनुष पाचोरे, कृष्णा विजयदत्ता, मनोज नागपुरे, स्मिता प्रभू, वंदना कचरे, पल्लवी ओढेकर, राजेंद्र घुगे आदी कलाकारांच्या या सिनेमात भूमिका आहेत. छायांकन बाशालाल सय्यद यांनी केलं असून, राहुल भातणकर यांनी संकलन केलं आहे. संगीत दिग्दर्शन अवधूत गुप्तेचं, तर नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांच आहे. रोहित नागभिडे यांनी या सिनेमाला पार्श्वसंगीत दिलं आहे. बाबासाहेब पाटील आणि विशाल चव्हाण या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

६ जुलै ला ‘गोटया’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

4.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement