Latest News
Typography

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी 'अ.ब.क' या मराठी चित्रपटातून तो मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याच्या मराठीत पदार्पणाने मराठी रसिकांना त्याचा डाशिंग लुक पाहता येणार आहे. अ.ब.क या चित्रपटात सुनील शेट्टीने 'बाप्पा' हि व्यक्तिरेखा साखारली असून सुनील शेट्टीचे सध्या 'बाप्पा बाप्पा' हे गाणे सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे. सुनील शेट्टीचा या चित्रपटातील आगळावेगळा रोल रसिकांना नक्कीच आवडेल.

या चित्रपट तो मराठीत बोलला असून त्याचे चित्रपटातील संवाद मराठी आहेत. सुनील शेट्टी म्हणाला, "मी महाराष्ट्रीय आहे. आमचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रात राहते. मराठी सण, मराठी अस्मिता त्याचबरोबर मराठी खाद्यपदार्थ मला खूप आवडतात."

ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट व वेंकीज प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित व रामकुमार गोरखनाथ शेडगे दिग्दर्शित 'अ ब क' या मराठी चित्रपटाचे लेखक आबा गायकवाड असून संगीतकार बापी - टूटूल व साजिद वाजीद हे आहेत. तर कॅमेरामन महेश अने हे आहेत. साहिल जोशी, मैथिली पटवर्धन, सनी पवार, आर्या घारे, विजय पाटकर, सतीश पुळेकर, किशोर कदम आदि कलाकार या चित्रपटात आहेत. अमृता फडणवीस यांनी या चित्रपटात स्त्रियांना प्रेरणा देणारे पेटूनी 'उठू दे एक ज्वाला' हे गीत गायले आहे.

येत्या ८ जून रोजी 'अ.ब.क' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे.

Suniel Shetty Marathi Debut Film Aa Bb Kk 02

Suniel Shetty Marathi Debut Film Aa Bb Kk 03

Suniel Shetty Marathi Debut Film Aa Bb Kk 04

Suniel Shetty Marathi Debut Film Aa Bb Kk 05

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement