Latest News
Typography

मुंबई ... सात बेटांची पसरलेली मायावी नगरी. हिने प्रत्येकाला आपल्यात सामावून घेतलं आहे! या नगरीची खासियत म्हणजे एका बाजूला गगनचुंबी इमारती तर दुसरीकडे अजगरासारखी पसरलेली इथली झोपडपट्टी. मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी अर्थात धारावी..!! अगदी सामान्य माणसापासून, नगरसेवकापासून ते थेट मंत्र्यांपर्यंत साऱ्यांचाच रस या झोपडपट्टीत आहे. या झोपडपट्टीत राहतात अनेक जातीधर्माचे लोक!! त्यातूनच हाणामारी, मारामारी, वाद होत असतात. हे वाद इथलेच लोकलभाई अर्थात झोपडपट्टीदादा सोडवतात. अगदी लहान वयात इथल्या मुलांना याची सवय लागते. त्यातून गुंडगिरी, भाईगिरी जन्माला येते. अशाच एका झोपडपट्टीतील सात बालगुन्हेगारांची कथा उलगडून दाखवणारा ‘पटरी बॉईज’ हा मराठी चित्रपट १९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘श्रीरंगलेखा एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती वेंकटवर्धन नरसिंहन आएंगर, श्रीधर आएंगर, अश्विन भराडे यांनी केली असून दिग्दर्शन अजित साबळे आणि मनोज येरूणकर यांनी केले आहे.

पाकिटमारी, छोट्या हाणामाऱ्या करणाऱ्या या सातजणांना एका चोरीच्या दरम्यान एक गोष्ट सापडते. ही गोष्ट मिळवण्यासाठी या सात जणांमध्ये झालेला संघर्ष आणि या सात जणांकडून ही गोष्ट मिळवण्यासाठी इतरांनी केलेली धडपड यावर हा चित्रपट बेतला आहे. अरुण नलावडे, गणेश यादव, मिलिंद गवळी, संजय खापरे, भूषण घाडी, मौसमी तोंडवळकर, डॉ.राजेश आहिर, संदीप जुवाटकर, नितीन बोधारे, मीरा जोशी, विकास खैरे, मिथुन चव्हाण, जयेश चव्हाण, सुधीर घाणेकर, परी लता, सानिया पाटील, श्रद्धा धामणकर या कलाकारांच्या ‘पटरी बॉईज’ चित्रपटात भूमिका आहेत.

Click image to see HD Poster

Patri Boys Marathi Film Official Poster Small

चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद अजित साबळे आणि मनोज येरूणकर यांनी लिहिले आहेत. छायांकन अयुब शेख तर संकलन अनिल थोरात यांचे आहे. दीपक आगनेवर, राज सागर यांनी लिहिलेल्या गीतांना आदर्श शिंदे, रितू पाठक, शाहिद माल्या यांनी स्वरबद्ध केली आहेत. अमोल–परेश, शेज म्युजिक यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. कलादिग्दर्शन मयूर निकम तर नृत्यदिग्दर्शन संतोष आंब्रे यांचे आहे. वेशभूषा तेजश्री मोरे तर रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे.

१९ ऑक्टोबरला ‘पटरी बॉईज’ चित्रपटगृहात येत आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement