Latest News
Typography

'दिल दोस्ती दुनियादारी' या लोकप्रिय मालिकेतील 'निशा' आठवतेय का? राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली ही निशा, म्हणजेच मंजिरी पुपाला लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

सचिन दरेकर दिग्दर्शित 'पार्टी' सिनेमात ती 'दिपाली' नामक एका बिनधास्त मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. यापूर्वी मंजिरीने हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये काम केले असून, 'ग्रहण' मालिकांद्वारे ती घराघरात पोहोचली. मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स निर्मित 'पार्टी' या सिनेमात तिच्यासोबत सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर आणि प्राजक्ता माळी हे कलाकारदेखील झळकणार आहेत.

Party Character Intro Dipali Manjiri Pupala

Manjiri Pupala Debut Party 01

Manjiri Pupala Debut Party 02

Manjiri Pupala Debut Party 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement