Latest News
Typography

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेते नंदू माधव आणि अभिनेत्री देविका दफ्तरदार यांनी मराठी नाट्य, चित्रपट क्षेत्रात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांवर आपला ठसा उमटवत स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केलेल्या या दोन्ही कलाकारांनी आजपर्यंत एकत्रित काम केलेले नाही, मात्र आता योगायतन फिल्मस् प्रस्तुत ‘परी हूँ मैं’ या आगामी मराठी चित्रपटात प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शिलवंत आहेत.

‘परी हूँ मैं’ हा चित्रपट टीव्ही मालिका, रियालिटी शो अशा चंदेरी दुनियेतील बालकलाकारां भोवती फिरणारा आहे. या चित्रपटामध्ये नंदू माधव प्रेमळ वडिलांच्या तर देविका शिस्तप्रिय आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर बालकलाकार श्रुती निगडे त्यांच्या मुलीच्या भूमिकेत आणि अभिनेत्री फ्लोरा सैनी महत्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटातील गाणी संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केली असून शंकर महादेवन, अमृता फडणवीस, जिया वाडकर आणि मंदार पिलवलकर यांचा स्वर गीतांना लाभला आहेतर अभिषेक खणकर आणि सचिन पाठकगीतकार आहेत.

Devika Daftardar Nandu Madhav Toegther Pari Hoon Main 01

उर्जा, पोर्ट, रिअल इस्टेट, निर्यात, टाउनशीप आदी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या योगायतन ग्रुपचे प्रमुख डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शीला सिंह ‘परी हूँ मैं’ या चित्रपटाचे निर्माते आहेत, चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची तर पटकथा मच्छिंद्र बुगडे, रोहित शिलवंत आणि संकेत माने यांची असून संवाद योगेश मार्कंडे यांचे आहेत.

मध्यमवर्गीय कुटुंब आणि चंदेरी दुनिया या भोवती फिरणारा मनोरंजक, कौटुंबिक आणि भावनिक असा अतिशय वेगळा असलेला ‘परी हूँ मैं’हा मराठी चित्रपट येत्या ७ सप्टेबर रोजी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Devika Daftardar Nandu Madhav Toegther Pari Hoon Main 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement