Latest News
Typography

'सलमान सोसायटी' या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण नुकतेच नवी मुंबईतील कळंबोली येथे करण्यात आले. 'पार्टी दणाणली' गाण्याचे बोल असून चित्रपटात पुष्कर लोणारकर, शुभम मोरे, विनायक पोतदार आणि गौरव मोरे (गावठी आणि संजू चित्रपट फेम ), यांच्यावर हे विशेष गाणे चित्रीत करण्यात आले. चित्रीकरणावेळी अभिनेत्री नम्रता आवटे ही विशेष पेहराव धारण करुण सलमान सोसाइटी च्या पार्टी दणाणली वर थिरकताना दिसली. ह्या चित्रपटात नम्रता एका मुख्य भूमिकेत असून ही भूमिका अद्याप उघड करण्यात आलेली नाही.

हे गाणे श्रेयस आंगणेने संगीतबद्ध केले असून नागेश मोरवेकरने गायले आहे. आणि अमित बैंग ने कोरियोग्राफ केले आहे. 'सलमान सोसायटी' चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश काशीनाथ पवार व निर्मिती दशरथ राजेंद्र यादव, रेखा सुरेंद्र जगताप, संपतराव पाटील व शांताराम भोंडवे सोबत प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत होत आहे . 'सलमान सोसायटी' हा चित्रपट बालशिक्षणावर आधारित असून "पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया" ह्या टॅगलाईनवर आहे.

चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, नवी मुंबई च्या जवळील भागात होणार आहे, तसेच चित्रपट ह्या वर्षी डिसेंबर मध्ये प्रदर्शित करण्याचा मानस निर्मात्यांचा आहे.

Gaurav More Party Dananali Song

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement