Latest News
Typography

पुन्हा बहरणार रंगभूमी... अवतरणार सुवर्णकाळ ... वायाकॉम18 स्टुडीओज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा विलक्षण प्रवास. वायाकॉम18 स्टुडिओज बायोपिक्सच्या उल्लेखनीय सादरीकरणासाठी प्रसिध्द आहे. मराठी मध्ये पहिल्यांदाच डॉ.काशिनाथ घाणेकर यांच्यावर सिनेमा येत असल्याने या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. चित्रपटाचा विषय, त्यामधील तगडे कलाकार यामुळे चित्रपट बराच चर्चेत राहिला असून हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. सुबोध भावे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून चित्रपटाच्या दोन्ही टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाच्या टीजरला ४.५ लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. वायाकॉम18 स्टुडीओजप्रस्तुत या चित्रपटाचा ट्रेलर सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन यांच्या उपस्थित नुकताच प्रदर्शित झाला. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ८ नोव्हेंबर रोजी “आणि ... डॉ. काशिनाथ घाणेकर” हा सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे, यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले. प्रभावशाली संवादफेक, जरब बसणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती. मराठी थेटरमध्ये पहिली शिट्टी वाजली ती डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासाठी... कधी लाल्या म्हणून तर कधी संभाजी म्हणून प्रेक्षकांच्या मनात यांनी अढळ स्थान मिळवले. ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते असे डॉ.काशिनाथ घाणेकर ... स्वत:चं नाव शेवटी लिहण्याची प्रथा ज्यांनी सुरु केली ते सुध्दा काशिनाथ घाणेकरच ... अश्या या मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठी वायाकॉम18 स्टुडीओज सज्ज आहेत. हे जबरदस्त व्यक्तिमत्व पडद्यावर साकारत आहे सगळ्यांचा लाडका आणि अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे तसेच त्यांच्यासोबत असणार आहेत सोनाली कुलकर्णी (सुलोचनादीदी), सुमीत राघवन (डॉ.श्रीराम लागू), मोहन जोशी (भालजी पेंढारकर), आनंद इंगळे (प्रा.वसंत कानेटकर), प्रसाद ओक (प्रभाकर पणशीकर), वैदेही परशुरामी (कांचन घाणेकर), नंदिता धुरी (ईरावती घाणेकर), हा सिनेमा ८ नोव्हेंबर रोजी सर्वत्र रिलीझ होत आहे.

Click Here to watch the Trailer

वायाकॉम18 स्टुडीओज चे सीओओ, अजित अंधारे म्हणाले, “आमच्या पुढील चित्रपटामधून ऐश्वर्यसंपन्न मराठी रंगमंचावरील पहिल्या आणि शेवटच्या “सुपरस्टार” ची कथा आम्ही पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहोत. मराठी रंगभूमीवरील या कलाकाराचा जीवनप्रवास कोणी ऐकला नसेल किंवा कोणाला माहिती नसेल तर तो मोठ्या पडद्यावर बघण्याची सुवर्णसंधी आम्ही प्रेक्षकांना देणार आहोत. रंगमंच्यावर यशस्वी कारकीर्द गाजवणाऱ्या या कलाकारावरील चित्रपट बघण म्हणजे एक सुखद अनुभव असेल हे निश्चित!"

वायाकॉम18 स्टुडीओज मराठी व कलर्स मराठीचे व्यवसाय प्रमुख, निखिल साने म्हणाले, “मला असं वाटत गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटामध्ये वेगवेगळे विषय येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर वायाकॉम18 कडून येणारा या वर्षातील आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे “आणि...डॉ.काशिनाथ घाणेकर”. या चित्रपटाद्वारे डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास या चित्रपटाद्वारे सादर करतोच आहोत, सुंदर स्टारकास्ट देखील आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, या सिनेमाद्वारे एक काळ, एक पिढी आम्ही प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत. ट्रेलरद्वारे १९६० – ८० चा काळ, त्या काळातील वैभव – वाद विवाद, त्या काळातील पात्रं सगळंच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने ही अशी कथा मांडलेली आहे ज्यामध्ये रंगभूमी वरील पडद्या मागच्या, आणि पडद्यावरच्या लोकांचा खरा प्रवास प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि मला अस वाटत हे या चित्रपटाचं वैशिष्ट आहे.

Ani Dr Kashinath Ghanekar Trailer Launch 03

आपल्या भुमिकेबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला, “मराठी रंगभूमीवर उभं रहाण्याची थोडीशी धडपड करणाऱ्या माझ्यासारख्या कलावंताच्या आयुष्यात मराठी रंगभूमीच्या पहिल्या सुपरस्टारची व्यक्तिरेखा येणं ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. “आणि...डॉ.काशिनाथ घाणेकर” या चित्रपटाच्या माध्यमातून डॉ.काशिनाथ घाणेकर यांचं चरित्र आभ्यासाल मिळालं, त्यांच्या विषयी ऐकायला मिळालं, त्यांच रूप पहायला मिळालं, त्यांनी केलेल्या नाटकातली स्वगत सादर करायला मिळाली, त्यांना जवळून स्पर्श करू शकलो, त्याचबरोबर त्या काळातल्या, त्यांच्याबरोबरच्या अनेक समकालीन ज्येष्ठ श्रेष्ठ दिग्गजांना देखील स्पर्श करू शकलो. मला अस वाटतं या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी रंगभूमीवरच्या या सर्व मानाच्या शिलेदारांना दिलेली ही आदरांजली आहे, आणि त्यांना केलेला सलाम आहे”.

ज्येष्ठ श्रेष्ठ सुलोचनाबाईंची व्यक्तिरेखा सोनाली कुलकर्णी या चित्रपटातून साकारणार असून आपल्या भुमिकेबद्दल बोलताना ती म्हणाली, “येत्या ८ नोव्हेंबरला “आणि...डॉ.काशिनाथ घाणेकर” हा आमचा चित्रपट येतो आहे या नावात जी जादू आहे ती प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रीलीझ झाला आहे. आम्ही सगळे चित्रपटामध्ये कसे दिसत आहोत ते प्रेक्षकांनी बघितले आहे. प्रेक्षकांच्या मनात चित्रपट बघण्याची उत्सुकता निर्माण झाली असेल. या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरचा हा सुवर्णकाळ प्रेक्षकांसमोर सादर करताना आम्हांला खूप आनंद होत आहे.”

ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांची भूमिका चित्रपटामध्ये सुमीत राघवन साकारणार असून या अनुभवाबद्दल बोलताना म्हणला, “अशा मोठ्या चित्रपटाचा भाग होणे माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मराठी नाटक प्रेमींना मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास, तो सुवर्णकाळ तसेच त्या सुवर्ण क्षणांना पुन्हा एकदा बघण्याची संधी या चित्रपटाद्वारे मिळणार आहे. याचबरोबर नवीन पिढीला त्याकाळातील दमदार अभिनेते आणि वैभवशाली रंगभूमीची परंपरा जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. मी स्वत: नाटक आणि रंगभूमीचा चाहता असल्याने मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो कि, मला ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. यापेक्षा जास्त मी काय मागू शकतो.”

Ani Dr Kashinath Ghanekar Trailer Launch 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement