Latest News
Typography

'मानसीचा चित्रकार तो' या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या ऋत्विक केंद्रे ने मराठी सिनेसृष्टीत व नाट्यसृष्टीत स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. गेल्या महिन्यात त्याचा 'ड्राय डे' हा सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमातील त्याच्या कामाला प्रेक्षकांची पसंती लाभली. सध्या ऋत्विक आपल्या आगामी 'सरगम' सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. मराठी सिनेसृष्टीसोबतच ऋत्विक दाक्षिणात्य सिनेमातही अभिनय करण्यासाठी सज्ज झाला असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

Rutwik Kendre 06

सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांचा मुलगा असलेल्या ऋत्विकला अभिनयाचे बाळकडू घरातून लाभले होते. लहानपणापासूनच अभिनयाचे संस्कार झाले असल्यामुळे ऋत्विक नाटक, मालिका, सिनेमा व निर्मिती या क्षेत्रांमध्ये अगदी बिनधास्त वावरताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋत्विक दाक्षिणात्य सिनेसृष्टीत लवकरच पदार्पण करणार आहे.

Rutwik Kendre 05

या चित्रपटासाठी तो खूप मेहनत घेतो आहे. तसेच तो मार्शल आर्ट्ससुद्धा प्रशिक्षण घेतो आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी सध्या तो फिटनेसकडे खूप लक्ष देतो आहे. या चित्रपटाचे शीर्षक व कथानकाबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. त्याच्या या सिनेमाबद्दल अधिकृतरित्या ऋत्विककडून जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

Rutwik Kendre 04

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement