Latest News
Typography

वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत अभिनयात उतरलेला 'कान्हा' लवकरच आगामी 'माझा अगडबम' या सिनेमाद्वारे प्रेक्षकांसमोर येत आहे. विशेष म्हणजे, या सिनेमात सुबोध भावेदेखील असल्याकारणामुळे वडील आणि मुलाची हि जोडी प्रथमच ऑनस्क्रिन एकत्र येत आहे. 'पेन इंडिया कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत 'माझा अगडबम' हा सिनेमा २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तृप्ती भोईर लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमाद्वारे, नाजूका अनेक वर्षानंतर लोकांसमोर येणार असून, या अगडबम नाजुकाच्या छोट्या मित्राच्या भूमिकेत तो दिसणार आहे.

Kanha Subodh Bhave Maaza Agadbam 03

सुपरहिट 'अगडबम' चा दमदार सिक्वेल असलेल्या या सिनेमातील नाजूका तृप्ती भोईरनेच साकारली असून, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांसोबत तिने निर्मितीफळीतदेखील आपला सहभाग दर्शवला आहे. शिवाय, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.

Kanha Subodh Bhave Maaza Agadbam 01

Kanha Subodh Bhave Maaza Agadbam 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement