Latest News
Typography

झी युवाने नुकत्याच 'सूर राहू दे' आणि 'तू अशी जवळी राहा' २ नवीन मालिका प्रेक्षकांसाठी सादर केल्या. सूर राहू दे मधील प्रमुख भूमिका निभावणारा अभिनेता संग्राम साळवी आणि आम्ही दोघी मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडे हे दोघे यावर्षी लग्नबेडीत अडकले. खुशबू आणि संग्राम यांनी लग्न करून त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. ही दोघं म्हणजे चाहत्यांची आवडती जोडी आहे आणि ते नेहमीच या दोघांवर प्रेमाचा वर्षाव करतात. थोड्याच दिवसात दिवाळी हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतील. खुशबू आणि संग्रामाची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी असणार आहे आणि त्यामुळे ती त्यांच्यासाठी तितकीच खास असणार आहे. ते दोघेही त्यांची पहिली दिवाळी कशी साजरी करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते अगदी उत्सुक आहेत.

खुशबू आणि संग्राम त्यांच्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून त्यांच्या परिवारासोबत हा सण साजरा करणार आहेत. दिवाळी म्हंटल कि खूप तयारी आणि साफसफाई आली म्हणून खुशबू आणि संग्राम यांनी जबाबदारी देखील वाटून घेतली आहे. खुशबू फराळ आणि घराची सजावट ठरवणार असून संग्राम तिला त्यात मदत करणार आहे. या दोघांनी सणाची तयारी चालू देखील केली आहे. दिवाळी म्हणजे भेट वस्तू देणे देखील आले. खुशबूने संग्रामला स्पेशल गिफ्ट देण्याचे ठरवले आहे. खुशबू संग्रामसाठी दिवाळीच्या प्रत्येक दिवशी घालायला वेगवेगळ्या रंगाचे सदरे घेणार आहे, कारण खुशबूला संग्रामचा पारंपरिक लुक खूप आवडतो.

Actor Sangram Salvi Actress Khushboo Tawde 01

खुशबू म्हणाली, "ही आमची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आणि त्यामुळे आमच्यासाठी खूप खास आहे. बॅचलर्स लाईफ मधून बाहेर पडून आता आमचा एक जोडपं म्हणून प्रवास चालू झाला आहे त्यामुळे घराची सजावट वगैरे याची तयारी देखील करावी लागणार आहे. दिवाळीची खरेदी खूप महत्वाची असते. यावेळी मी माझ्यासोबतच संग्रामसाठी पण शॉपिंग करणार आहे. मी खूप उत्सुकतेने दिवाळीची वाट बघतेय. माझ्या सर्व चाहत्यांना मी दिवाळीच्या खूपखूप शुभेच्छा देते. ही दिवाळी सर्वांसाठी समृद्धी आणि भरभराटीची जाओ."

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement