Latest News
Typography

मराठी चित्रपटसृष्टीत आई आणि मुलींच्या अनेक सुपरहिट जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. दिग्दर्शनात तसेच अभिनयात वरचष्मा गाजवणाऱ्या या सेलिब्रिटी मायलेकींच्या यादीत आता दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी आणि त्यांची लेक संहिता जोशीचा देखील समावेश झाला आहे.

आगामी 'माधुरी' या चित्रपटामधून संहिता मराठीत पदार्पण करते आहे. स्वप्ना वाघमारे जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात तिची प्रमुख भूमिका आहे. संहिता तिच्या आईसारखीच मेहनती आणि कामसू असल्याकारणामुळे, आगामी काळात स्वप्नाची ही 'संहिता' मराठीत सुपरहिट ठरेल, अशी अपेक्षा आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement