Latest News
Typography

बांद्रा पश्चिम येथील '‘आयअज्युर’' या अॅपल अधिकृत दुकानात नुकतंच प्रख्यात गायिका आशा भोसले व त्यांची नातं झनाई भोसले यांच्या हस्ते iPhoneXR लॉंच करण्यात आला आहे. प्रसंगी बॅण्ड ऑफ बॉईजने आशा भोसले यांच्या सदाबहार व मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात स्वरबद्ध केलेलं 'दिल सरफिरा' हे गाणे लाँच करून बॅण्ड ऑफ बॉईज पुन्हा एकदा नव्याने आपल्यासमोर आले आहेत. सोहोळ्यास बॅण्ड ऑफ बॉईज या लोकप्रिय बँडचे करण ओबेरॉय, चिंटू भोसले, शेरिन वर्गीस आणि डॅनी फर्नांडिस तसेच अनुजा भोसले आणि आनंद भोसले देखील उपस्थितीत होते.

Asha Bhosle Zanai Bhosle iPhone XR Launch 01

आपली नातं घेत असलेला पुढाकार पाहून आशा भोसलेंचा आनंद द्विगुणित झाला होता. अशावेळी त्या सांगतात की, "मला आणि माझ्या परिवाराला झनाईचा अभिमान वाटतो." बॅण्ड ऑफ बॉईज बद्दल सांगताना त्या म्हणतात की, "ते खरोखर चांगले गातात. मी त्यांना २००१ मध्ये त्यांच्या पहिल्या शोमध्ये मी त्यांना नाचत नाचत गाताना पाहिले होते आणि आज देखील ते पूर्वीप्रमाणेच नाचले व तितकेच सुंदर गायले."

झनाई भोसले सांगते की, "मी स्वतःला खूप नशीबवान समजते की, मी भोसले कुटूंबाचा एक भाग आहे. परंतु ज्यावेळी मी खडतर आयुष्य असणाऱ्या मुलींकडे पाहते त्यावेळी मला आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावे असे सतत वाटत असते. म्हणूनच मी 'आयअज्युर' ही नवीन कल्पना अस्तित्वात आणली. माझ्या 'आयअज्युर' या अॅपल अधिकृत दुकानातील विक्रेतीचा एक भाग 'नन्ही कली' या लहान मुलींसाठी काम करणाऱ्या एनजीओ ला जाणार आहे."

Asha Bhosle Zanai Bhosle iPhone XR Launch 02

आशा भोसले व अनुजा भोसले यांच्या ‘आयअज्युर’ स्टोरमध्ये iPhone XR पांढरा, काळा, निळा, पिवळा, कोरल आणि लाल अशा सहा रंगांमध्ये उपलब्ध आहेत . '‘आयअज्युर’' हे अॅपल स्टोर शहरातील इतर अॅपल स्टोर्सपेक्षा वेगळा आहे कारण येथे काम करणारे सर्व लोकं अॅपल आणि त्याच्या उत्पादनांबद्दल पॅशनेट असलेले, त्या विषयी अधिकाधिक माहिती असेलेले व ग्राहकांना सर्वोत्तम संभाव्य अनुभव प्रदान करणारे आहेत. त्यांचा हेतू विक्री-उन्मुख नसून सेवाप्रधान करणे आहे.

सध्या जोरदार सुरु असणाऱ्या पर्यावर संरक्षणाच्या चळवळीचा एक भाग म्हणून आशा भोसले व झनाई भोसले या आजी-नातीच्या जोडीने #PlantATree ही नवीन चळवळ सुरु केलेली आहे. संगीताच्या वारश्या बरोबरचं समाजप्रतीच्या आपल्या कर्तव्याचे संस्कार देखील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जात असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आशा भोसले व झनाई भोसले ही आजी-नातीची आहे यात काही शंकाचं नाही.

Asha Bhosle Zanai Bhosle iPhone XR Launch 03

Asha Bhosle Zanai Bhosle iPhone XR Launch 04

Asha Bhosle Zanai Bhosle iPhone XR Launch 05

Zanai Bhosle, Asha Bhosle and Anuja Bhosle

Asha Bhosle Zanai Bhosle iPhone XR Launch 06

A Band Of Boys - Karan Oberoi, Chintoo Bhosle, Sherrin Varghese & Danny Fernandes at the launch of iPhone XR & the launch of their song Dil Sarphira at iAzure, Bandra

Asha Bhosle Zanai Bhosle iPhone XR Launch 07

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)