Latest News
Typography

राजकला मूवीज व बाबा मोशन पिक्चर्सच्या बॅनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजीव एस. रूईया यांनी केलं आहे. चित्रपटाच्या नावातच कथा लपलेली आहे. विनोदी व कौटुंबिक पार्श्वभूमीवर कथा आधारित असल्यामुळे प्रेक्षकांचं धमाल मनोरंजन होऊ शकतं. नुकतंच या चित्रपटाचं दुसरं पोस्टर लाँच करण्यात आलं.

Click image to see HD Poster

Majhya Baikocha Priyakar Official Poster 02 Small

प्रियदर्शन व अनिकेतसोबत भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, भारत गणेशपुरे, स्वाती पानसरे, अंशुमन विचारे, पदम सिंह, अनुपम ताकमोघे, सुरेश पिल्लई यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची पटकथा अभिजित गाडगीळ तर संवाद संदीप दंडवते यांनी लिहिली आहे. दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत. येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचे पेन मुव्हीज हे प्रस्तुतकर्ता आहेत.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement