Latest News
Typography

भीती ही श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. मग यात सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा अभिनेता असो. मनुष्य स्वभावाप्रमाणे त्यालाही भीती वाटणे साहजिकच आहे. अभिनेता प्रियदर्शनलाही 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमाच्या चित्रीकरणाच्यावेळी भीती वाटली होती.

या सिनेमाचे चित्रीकरण भोर येथे सुरु होते. या सिनेमातील काही भुताची दृश्य चित्रित करण्यात येणार होती. त्यामुळे सेटवर अंधार करण्यात आला होता. अशा वातावरणात चित्रीकरण करताना प्रियदर्शन बराच दचकत होता. त्याला अंधाराची भीती वाटू लागली होती. राजीव एस.रुईया हे सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

येत्या २३ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत. विवेक कर, राजू सरदार व प्रभाकर नरवडे यांचे संगीत या सिनेमाला लाभले आहे. राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि.या बॅनरखाली निर्मिती करण्यात आली आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement