Latest News
Typography

मराठी चित्रपटांतून नवनवीन जोड्या प्रेक्षकांसमोर येतात. त्यातल्या काही जोड्या प्रचंड लोकप्रियही होतात. नव्या दमाच्या कलाकारांमधली अशीच एक नवी आणि फ्रेश जोडी आता चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर "आम्ही बेफिकर" या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहे.

'आम्ही बेफिकर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!!

हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहित चव्हाण यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर रोहित पाटील हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचं आहे. खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा हा चित्रपट आहे.

Aamhi Befikar Film Mitali Mayekar Suyog Gorhe 01

सुयोग आणि मिताली आजवर मालिका-चित्रपटांतून आपल्यापुढे आले आहेत. मात्र, "आम्ही बेफिकर" हा त्यांचा एकत्रित पहिलाच चित्रपट आहे. नव्या दमाचे कलाकार आणि नव्या पिढीचा विषय मांडणारा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल. आता लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे.

Aamhi Befikar Film Mitali Mayekar Suyog Gorhe 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement