Latest News
Typography

असं म्हणतात की, माणूस जन्माला येण्या आधीपासून त्याचा संघर्ष सुरु झालेला असतो. संघर्ष हा माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. या संघर्षात जो जिद्द दाखवतो, धीराने उभा राहतो आणि स्वतःला घडवतो तोच नवा इतिहास घडवू शकतो. ‘पाटील’ चित्रपटाच्या रुपात एका प्रेरणादायी संघर्षकथेने प्रेक्षकांची मने जिंकली. राज्यातल्या बहुतांश भागात चित्रपट प्रदर्शित झाला तर काही ठिकाणी होऊ शकला नाही. प्रेक्षक आग्रहास्तव ‘पाटील’ येत्या २१ डिसेंबरला पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि., साचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि. निर्मित ‘पाटील संघर्ष... प्रेम आणि अस्तित्वाचा’ या चित्रपटात शिवाजी पाटील याचा संघर्षमय प्रवास मांडला आहे.

प्रेम आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या दोन्ही गोष्टींचा समतोल साधता आला की माणूस सुखी होतो. कर्तव्य आणि प्रेम या दोन गोष्टींची सांगड घालत शिवाजी पाटील यांचा भूतकाळ, संघर्ष, त्यांनी पचवलेले दुःख, अपमान आणि त्यानंतर ही परिस्थितीसमोर हार न मानता तिला धीराने उत्तर देण्याची त्याची जिद्द समोर येणार आहे. प्रेम, कर्तव्य यांच्यात समतोल साधू पाहणाऱ्या शिवाजीने हाती घेतलेलं ध्येय तो पूर्णत्वास नेईल का? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी ‘पाटील’ पहायलाच हवा.

संतोष राममीना मिजगर लिखित-दिग्दर्शित, पाटील चित्रपटात एस.आर.एम एलियन, शिवाजी लोटन, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, , यश आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. विशेष भूमिकेत डॉ. जगदिश पाटील (कोकण आयुक्त) आणि पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत ‘झी नेटवर्क एस्सेल व्हीजन चे चेअरमन डॉ. सुभाषचंद्रा दिसणार आहेत.

Patil Marathi Film Title 02

‘पाटील’ चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. ‘आनंद शिंदे, बिष्णू मोहन, बेला शेंडे, सुखविंदर सिंग, रेहा विवेक, गणपत मिजगर, बाबुल सुप्रियो, श्रेया घोषाल, यांनी चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहेत, तर गुरु ठाकूर, समीर, सुरेश पांडा-जाफर, संजय वारंग, एस.आर.एम. यांनी या चित्रपटासाठी गीतं लिहिली आहेत. संगीत दिग्दर्शन आनंद-मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी.एच.हारमोनी, एस.आर.एम. एलियन यांनी केले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.

या चित्रपटाची कथा,पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. बॉलीवूड टुरिझम आणि ‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जयशील मिजगर, तेजल शहा, नीता लाड, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे, रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश बीडकर, रामराव वडकुते, संतुकराव हंबर्डे, सौरभ तांडेल, दीपक दलाल, अभिराम सुधीर पाटील सहनिर्माते आहेत. विवेक सिंग कार्यकारी निर्माते आहेत. निलेश गावंड, मनीष शिर्के यांचे संकलन तर छायांकन सुधाकर रेड्डी यकंटी, राजा यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पृथा मांजरेकर, ज्योती मुलगीर यांनी केली आहे. ध्वनी अनिरुद्ध काळे तर व्ही.एफ एक्सची जबाबदारी प्रशांत मेहता, तर कला दिग्दर्शन सुरेश पिल्ले यांचे आहे.

‘पाटील’ २१ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Patil Marathi Film to Release Again 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement