Latest News
Typography

अभिनेत्री सैयामी खेर ने हिंदी चित्रपटसृष्टित दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरांचा चित्रपट मिर्ज़ियाँ मधून धमाकेदार पदार्पण केले होते. ह्या चित्रपटानंतर ही हुन्नरी अभिनेत्री रितेश देशमुख अभिनीत आगामी मराठी चित्रपट "माऊली" मधून मराठी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टित पदार्पणास सज्ज झाली आहे.

Saiyami Kher Mauli 02

सैयामी माऊली मुळे पहिल्यांदा रितेशबरोबर स्क्रीन स्पेस शेयर करत असून, तिच्या भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेतली आहे. सैयामी मराठी उत्तम बोलते पण माऊली चित्रपटासाठी तिला ग्रामीण लहेजा हवा होता आणि हा लहेजा शिकवला सर्वांचा फेवरेट सिद्धार्थ जाधव ने.

Saiyami Kher Siddharth Jadhav Mauli BTS 01

दोघांना ही क्रीडा आणि भाषेत स्वारस्यामुळे एकमेकांसोबत जास्त बोलू लागले. सिद्दार्थ आणि सैयामी ला सेटवर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांची भाषा आणि चित्रपटामध्ये वापरण्यात येणाऱ्या उच्चारणावर काम करत होते. त्यांनी भाषेवरील प्रत्येक लहान लहान गोष्टी समजावून घेतल्या व अमलात आणल्या. त्यांची हीच मेहनत चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये ही दिसून येतेय.

Saiyami Kher Siddharth Jadhav Mauli BTS 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement