Latest News
Typography

Zee5 वर नुकतीच आलेली ‘डेट विथ सई’ ही वेब सिरीज वेगवेगळ्या कारणांनी चर्चेचा विषय बनली आहे. ग्लॅमरस अदा असलेली आणि कमालीचा अभिनय करणारी सई ताम्हणकरने तिच्या या पहिल्या वेब सिरीजमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सई जरी या वेब सिरीजचा प्रमुख चेहरा असली तरी देखील या वेब सिरीजमध्ये आणखी एका चेहऱ्याने जबरदस्त काम केले आहे आणि ती व्यक्ती म्हणजे अभिनेता रोहित कोकाटे. रोहितने ‘डेट विथ सई’मध्ये उत्तम काम केलंय आणि खरोखर ज्याची भिती वाटेल असं उत्तम काम रोहितने केलंय हे स्वत: सईने एका मुलाखतीत म्हटले होते.

तसेच “मी पहिल्यांदा माझ्या करियरमध्ये एक कलाकार म्हणून ज्या व्यक्तीवर जेलस झाली ती व्यक्ती म्हणजे रोहित कोकाटे” असे सईने एका लाईव्ह चॅटमध्ये म्हटले होते. आतापर्यंत, सहकलाकार या नात्याने सईने नेहमीच दुसऱ्या कलाकारांच्या कामाचे, अभिनयाचे प्रामाणिक कौतुक केले आहे आणि त्याचप्रमाणे रोहितने त्याच्या अभिनयातून त्याच्या पात्रात खरेपणा आणलाय आणि त्याचं पात्रं इतकं खरं वाटतं की प्रेक्षकांना त्याला पाहिल्यावर भिती वाटेल हे नक्की. रोहितच्या अभिनयाचे कौतुक करताना त्याच्याविषयी ईर्ष्या वाटते असे सईने मजेशीर पध्दतीत म्हटले.

Sai Tamhankar Rohit Kokate Date With Saie 02

सईने रोहितच्या कामाचे कळत-नकळतपणे केलेल्या प्रशंसेवर रोहित कोकाटेने म्हटले की, “सईसोबत काम करण्याचा माझा अनुभव खूप छान होता. सई खरंच टॅलेंटेड आणि व्यक्ती म्हणून खूप खरी आणि डाऊन टू अर्थ आहे. सईसारख्या अभिनेत्रीने माझे कौतुक करणे ही माझ्यासाठी स्पेशल गोष्ट आहे. ‘डेट विथ सई’ मधील माझं एनआरआयचं पात्रं साकारण्यासाठी सईने क्षणोक्षणी मला मदत केली. माझं पात्रं खरं वाटावं यामागे सईची देखील तितकीच मेहनत आहे."

Sai Tamhankar Rohit Kokate Date With Saie 03

या वेब सिरीजच्या अगोदर रोहित कोकाटे याने ‘कौल: ए कॉलिंग’ आणि ‘बोगदा’ या मराठी चित्रपटांत काम केले आहे. पहिलीच वेब सिरीज अन् ती पण थ्रिलर अशा एका वेगळ्या माध्यमातून रोहित पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आला आहे आणि त्याच्या या पात्राचे प्रेक्षकांसह आपल्या मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी पण त्याचे कौतुक केले आहे.

एका फॅनचे कलाकारावर असलेले प्रेम कसे घातक ठरु शकते या विषयावर आधारित, सई ताम्हणकर आणि रोहित कोकाटेची प्रमुख भूमिका असलेली ‘डेट विथ सई’ वेब सिरीज पाहा फक्त Zee5 वर.

4.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement