Latest News
Typography

नवे आशय-विषय हे मराठी चित्रपटाचं वैशिष्ट्यं. आता परफ्युम असं सुवासिक नाव असलेल्या चित्रपटातून वेगळीच प्रेमकहाणी १ मार्चला प्रेक्षकांपुढे येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाँच करण्यात आले. याप्रसंगी कलाकार मंडळी आवर्जून उपस्थित होती.

'हलाल' सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या, तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'लेथ जोशी' या चित्रपटाची प्रस्तुती केलेल्या अमोल कागणे फिल्म्सच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी 'परफ्युम'ची प्रस्तुती केली आहे, तर एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये असून पोस्टरवरून ही सस्पेन्स-थ्रीलर प्रकारची प्रेमकहाणी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे कथानकात काय काय वळणं असतील याची उत्सुकता या पोस्टरवरून निर्माण झाली आहे. त्याशिवाय पोस्टरवरील रंगसंगतीमुळे ही कथा अत्यंत रंगीबेरंगी आणि व्हायब्रंट असेल, असाही अंदाज आपल्याला लावता येतो. म्हणूनच हा "परफ्युम" नक्कीच दरवळेल आणि प्रेक्षकांना आकर्षित करून घेईल यात शंका नाही.

Click image to see HD poster

Perfume Marathi Film First Look Poster Small

दिग्दर्शक आणि कॅमेरामन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिले आहे. चित्रपटाची कथा किशोर गिऱ्हे यांची असून प्रोडक्शन हेड म्हणून स्वप्नील दीक्षितने काम पाहिले आहे. ओंकार आणि मोनालिसा यांच्यासह चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे, शिल्पा ठाकरे, हिना पांचाळ असे उत्तम आणि अनुभवी कलाकारही या चित्रपटात आहेत.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement