Latest News
Typography

कॉलेज जीवनातलं आयुष्य धमाल असतं. करिअरचा विचार मनात असला तरी बेधुंदी, बेफिक्रीही असते. असेच बेफिकर असलेल्या चार मित्रांची "आम्ही बेफिकर" ही गोष्ट आता प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं नुकतंच सोशल मीडियाद्वारे टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं. ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, पोस्टरवरून हा चित्रपट युथफुल आणि धमाल असल्याची अंदाज बांधता येतो.

हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहित चव्हाण यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर रोहित पाटील हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचं असून चित्रपटाचे संगीत प्रणय अढांगळे यांचे आहे. खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा हा चित्रपट आहे.

Click image to see HD Poster

Aamhi Befikar Marathi Film Teaser Poster Small

सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी "आम्ही बेफिकर" या चित्रपटात दिसणार आहे. सुयोग आणि मिताली अनेक मालिका-चित्रपटांतून आपल्यापुढे आले आहेत. मात्र, "आम्ही बेफिकर" हा त्यांचा एकत्रित पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्यासह राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे नव्या दमाचे कलाकार आणि नव्या पिढीचा विषय मांडणारा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News