Latest News
Typography

फिल्ममेकर संजय जाधव ह्यांनी गुरूवारी सोशल मीडियावरून आपल्या 'लकी' ह्या नव्या चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची घोषणा केली आहे. 'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला 'लकी' सिनेमा ७ फेब्रुवारी २०१९ ला सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

एम एस धोनी आणि फ्लाइंग जाट सारख्या हिट सिनेमाची निर्मिती करणारे बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग 'लकी' सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत निर्माते म्हणून पाऊल ठेवत आहे. ह्यासंदर्भात बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे संचालक आणि लकी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग म्हणतात, “आमच्या निर्मितीसंस्थेला मराठी चित्रपटनिर्मितीत उतरण्याची बऱ्याच काळापासून इच्छा होती. संजय जाधव हे मराठी सिनेसृष्टीतले आघाडीचे फिल्ममेकर आहेत. त्यांच्यासोबत आम्ही पहिला सिनेमा केल्याचा आम्हांला आनंद आहे. आता लवकरच ७ फेब्रुवारीला आमचा हा सिनेमा रिलीज होईल. ”

दुनियादारी, तू हि रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा अशा सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या संजय जाधव ह्यांच्या लकी सिनेमातून साऊथ सिनेमा गाजवलेली अभिनेत्री दिप्ती सती पदार्पण करत आहे. अभय महाजन आणि दिप्ती सती सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसतील.

फिल्ममेकर संजय जाधव म्हणतात, “फेब्रुवारी महिन्यात रिलीज होणारा आमचा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा तरूणाईला खूप आवडेल, असा आमचा विश्वास आहे. तुमच्या संपूर्ण कुटूंबासोबत तुम्ही हा सिनेमा पाहू शकाल आणि तुमचं दोन तास भरपूर मनोरंजन होईल, ह्याची मला शाश्वती आहे.”

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement