Latest News
Typography

"शिवा - एक युवा योद्धा" या सिनेमाचा पोस्टर लाँच सोहळा अनोख्या पद्धतीने करण्यात आला. पारंपरिक पद्धतींचा अवलंब न करता, नुकत्याच झालेल्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच पत्रकारांच्या हस्ते सिनेमाचे पोस्टर लाँच करण्याची नवीन संकल्पना सिनेमाच्या टीम कडून राबविण्यात आली. समाजातील सद्य स्थितीचे तठस्थपणे वर्णन करणारे प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी यांचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेऊन यंदाच्या पत्रकार दिनाचे नेमके औचित्य साधत एस.जी.एस. फिल्म्स निर्मित 'शिवा' या मराठी सिनेमाचे प्रभावी पोस्टर अनावरण करण्यात आले.

Shiva Ek Yuva Yoddha Marathi Film Poster Launch 02

पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथे झालेल्या या कार्यक्रमात सन्मानीय पत्रकार मंडळी विलास भेगडे (लोकमत), संदीप भेगडे (पुण्यनगरी), जगन्नाथ काळे (पुढारी), गणेश दुदम, मंगेश फत्ते, ऋषिकेश लोंढे, महेश भाग्यवंते आणि सिनेमातील प्रमुख कलाकार सिद्धांत मोरे, योगिता चव्हाण, दिग्दर्शक विजय शिंदे, निर्माते व्ही.डी. शंकरन, डॉ. संजय मोरे, गणेश दारखे उपस्थित होते.

Shiva Ek Yuva Yoddha Marathi Film Poster Launch 03

शिवा सिनेमाची कथा आजच्या तरुणाईचा एक वेगळा जोश आणि उत्साह दाखवणारी आहे. इच्छाशक्ती, जिद्द आणि आकांक्षेचा बाॅईलिंग पॉईंट वाईट मार्गाच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि तत्त्वांची जाण करून देणारा, आजच्या पिढीला आवडेल असा हा सिनेमा येत्या १५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. गावाच्या प्रगतीसाठी आणि गावकऱ्यांसाठी शहिद झालेल्या वडिलांच्या मुलाचा संघर्ष या सिनेमात चित्रित करण्यात आला आहे.

Click image to see HD Poster

Shiva Ek Yuva Yoddha Marathi Film First Look Poster Small

प्रेक्षकांना आवडेल असा एंटरटेनमेंट पॅकेज असलेला या सिनेमात अभिनेता सिद्धांत मोरे हा नवीन चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉडीबिल्डिंग मध्ये मिस्टर एशिया असलेल्या सिद्धांतने चित्रपटासाठी स्वतः स्टंट दिलेले आहेत. पिळदार शरीरयष्टी असलेला हिरो या 'शिवा'च्या निमित्ताने पाहावयास मिळणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना "शिवा - एक युवा योद्धा" मनोरंजनाची उत्तम पर्वणी असणार आहे याची झलक सिनेमाच्या या पोस्टर च्या निमित्ताने मिळत आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement