Latest News
Typography

सस्पेन्स थ्रीलर प्रेमकहाणी असलेल्या 'परफ्युम' या चित्रपटाचं म्युझिक लाँच धमाकेदार सोहळ्यात करण्यात आलं. हा चित्रपट १ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उत्सुकता वाढवणाऱ्या कथानकासह श्रवणीय गाणी हे चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.अतिरिक्त आयुक्त क्राईम ब्रांच श्री. संदीप कर्णिक आणि विशेष अधिकारी श्री शरद खाडे (आरोग्य, वाहतूक, कामगार आणि राज्य उत्पादन) यांच्या हस्ते कलाकार आणि अन्य मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत या चित्रपटाचे म्युझिक लाँच करण्यात आले.

Music Launch Video

'हलाल' सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या, तसेच आगामी 'लेथ जोशी' चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे फिल्म्सच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी 'परफ्युम' ची प्रस्तुती केली आहे, तर एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक आणि कॅमेरामन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिले आहे. ओंकार आणि मोनालिसा यांच्यासह चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे, हिना पांचाळ असे उत्तम आणि अनुभवी कलाकारही या चित्रपटात आहेत.

Actors (L-R) Mohini Awasare, Shravani Abhang, Preeti Rayte, Sahil Kumar, Lead Actor Omkar Dixit, Heena Panchal, Lead Actress Monalisa Bagal, Bhagyashree Nhalve & Vijay Gite

Perfume Marathi Film Music Launch 03

या चित्रपटात चार गाणी ऐकायला-पहायला मिळणार आहेत. मंगेश कांगणे, विद्याधर भावे, मुग्धा चोळणकर यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार अजित परब यांचे संगीत लाभले असून ही गाणी हर्षवर्धन वावरे, अजित परब, आनंदी जोशी, मुग्धा सबनीस, उर्मिला धनगर यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच म्युझिकल मेजवानी ठरेल.

किशोर गिऱ्हे यांची कथा असून, पॉल शर्मा यांनी संकलन केलं आहे. प्रोडक्शन हेड म्हणून स्वप्नील दीक्षितने काम पाहिले आहे.

Click image to see HD Poster

Perfume Marathi Film Official Poster Small

 

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement