Latest News
Typography

सुप्रसिध्द अभिनेत्री सई ताम्हणकरचा फॅनक्लब ‘सईहोलिक्स’ दरवर्षी वर्षाच्या पहिल्या रविवारी सईसोबत एक अनौपचारिक भेट घेत असतो. सईहोलिक्सचे हे गेटटूगेदर सई आणि तिच्या चाहत्यांसाठी वर्षातला सर्वात पहिला मेमोरेबल सोहळा असतो. ज्यात दरवर्षी सईहोलिक्सच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचाही आढावा घेतला जातो. यंदाचं हे चौथं वर्ष आणि ते सईहोलिक्ससाठी आठवणीतलं करण्यासाठी सईने यंदा त्यांना अनोख्या भेटवस्तू दिल्या.

सईहोलिक्सच्या ह्या फंक्शनला उपस्थित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सईने तिची घड्याळं, कपडे, एक्सेसरीज आणि बऱ्याचशा नेहमीच्या वापरातल्या गोष्टी आपल्या चाहत्यांना गिफ्ट द्यायला आणल्या होत्या. सईहोलिकससाठी अर्थातच ही आनंदाची पर्वणी होती. त्याचसोबत यंदा सईने आपल्या हिट डायलॉग्सचे टीशर्ट्सही भेट दिले.

Sai Tamhankar Saiholics Getogether 2019 02

सईचे ‘चड्डीत राहायचं’, ‘बच्चूच आहेस तू’, ‘जुजबी’ असे अनेक संवाद तिच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यात सईहोलिक्स दरवर्षी सईच्या वाढदिवसाला झाडे लावण्याचा उपक्रम करतात. त्यामूळे ‘बघताय काय झाडे लावा’ ह्याही संवादाची भर आता सईच्या चाहत्यांमध्ये पडलीय. म्हणूनच ह्यासंवादांचे टीशर्ट्स यंदा सईने तिच्या चाहत्यांना भेट दिले.

ह्या उपक्रमाविषयी सई ताम्हणकरला विचारल्यावर ती म्हणाली, "सईहोलिक्सच्या माध्यमातून मी खूप वेगवेगळ्या लोकांना भेटू शकते आणि माझ्या चाहत्यांमूळे मला असंख्य आठवणी मिळतात. आम्ही एकत्रितपणे अशा काही उपक्रमांचा भाग होतो, ज्यामध्ये खूप सकारात्मकता असते. मला खूप अभिमान आहे की, माझा फॅनक्लब फक्त माझी भेट घेण्यासाठीच नाही आहे, तर संघटितरित्या समाजासाठी काही चांगल्या गोष्टी करणाऱ्यांचा ग्रुप आहे, ज्या मलाही करायला आवडतात. माझ्या निमीत्ताने अनेक नवीन लोकं एकमेकांना भेटतात. त्यांच्यात निर्माण झालेल्या मैत्रीचे निमीत्त मी असल्याचा मला आानंद आहे. माझ्या तत्वांवर आणि विचारांवर चालणारा हा फॅनक्लब आहे आणि मी असो नसो, माझा फॅनक्लब अजरामर असावा, असं नेहमी वाटतं. मला माझ्या फॅन्सना भेटायला नेहमीच आवडते. माझे फॅन्स मला चांगले काम करण्याची उर्जा देतात.”

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement