Latest News
Typography

झी एंटरटेनमेंट एन्टरप्रायजेस लिमिटेडची एकमेव मराठी चित्रपट वाहिनी झी टॉकीज प्रस्तुत सर्वांच्या लाडक्या आणि प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहतात अशा महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१८ या पुरस्कार सोहळ्याचे नामांकन घोषित करण्यात आले आहे. झी टॉकीज प्रस्तुत महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे मराठी सिनेसृष्टीतील एकमेव व्युव्हर्स चॉईस अवॉर्ड्स आहेत. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार नवव्या वर्षात पदार्पण करत असून, या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिली आहे. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कारांसाठी १२ विभागात नामांकन जाहीर झालं असून, ‘फेव्हरेट चित्रपट’, ‘फेव्हरेट अभिनेता’, ‘फेव्हरेट अभिनेत्री’, ‘फेव्हरेट स्टाईल आयकॉन’, ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’, ‘फेव्हरेट गीत’ या प्रसिद्ध विभागात कमालीची टक्कर असणार आहे. मराठी चित्रपट चाहते आजपासून या अद्भुत पुरस्कार सोहळ्यात आपल्या लाडक्या कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी आपले मत २५ जानेवारी पर्यंत नोंदवू शकतात.

प्रेक्षक https://zeetalkies.zee5.com/mfk2018/ या संकेतस्थळावर जाऊन आपले मत नोंदवू शकतात

‘फेव्हरेट चित्रपट’ या विभागात वेगवेगळ्या शैलीचे तसेच समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळालेल्या चित्रपटांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी येरे येरे पैसा, बॉईज २, फर्जंद, नाळ, मुळशी पॅटर्न आणि बबन या चित्रपटांमध्ये चुरशीचा सामना रंगणार आहे.

Maharashtracha Favorite Kon 2018 Nominations 02

२०१८ मध्ये आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या कलारांचा फेव्हरेट अभिनेता आणि फेव्हरेट अभिनेत्री या विभागात समावेश करण्यात आला आहे. पुष्पक विमान या चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी सुबोध भावे याने फेव्हरेट अभिनेता या विभागात नामांकन पटकावलं आहे. त्याचबरोबर मुळशी पॅटर्न चित्रपटातील कमाल अभिनयासाठी ओम भुतकर, नाळ मधील सहज सादरीकरणासाठी श्रीनिवास पोकळे, बबन मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी भाऊसाहेब शिंदे आणि बॉईज २ चित्रपटात प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी पार्थ भालेराव यांनी विभागात नामांकनं पटकावली आहेत.

फेव्हरेट अभिनेत्री या विभागात धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने बकेट लिस्ट मधील सादर केलेली उत्तम भूमिका नामांकनं पटकावून गेलीय, तसेच सोनाली कुलकर्णी हिच्या गुलाबजाम मधील प्रेरक कलाकृती, तेजस्विनी पंडित हिची येरे येरे पैसा मधील अफलातून कामगिरी, कल्याणी मुळे हिचा न्यूड मधील उत्कृष्ट अभिनय, फर्जंद मधील मृण्मयीने सादर केलेली अप्रतिम भूमिका आणि नाळ मधील गोड देविका दफ्तारदार यांनी देखील या विभागात नामांकनं पटकावली आहे.

Maharashtracha Favorite Kon 2018 Nominations 03

फेव्हरेट गीत या विभागात येरे येरे पैसा मधील खंडाळा घाट आणि टायटल ट्रॅक, बॉईज २ चित्रपटातील गोटी सोडा, मुळशी पॅटर्न या चित्रपाटातील अरारारा, रेडू मधील देवाक काळजी रे, तसेच नाळ चित्रपटातील जाऊ दे न व या गाण्याचा समावेश आहे.

तरुणींच्या काळजाचा ठाव घेणारे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते अंकुश चौधरी, अमेय वाघ, ललित प्रभाकर, सिद्धार्थ चांदेकर, उमेश कामात आणि स्वप्नील जोशी यांनी महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन या विभागात नामांकन पटकावलं आहे. तसेच सिनेसृष्टीतील स्वप्नसुंदरी अभिनेत्री सई ताम्हणकर, मिथिला पालकर, मृणाल ठाकूर, वैदेही परशुरामी, सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी देशपांडे यांनी फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर या विभागात नामांकन पटकावले आहे.

या व्यतिरिक्त खालील विभागातील आवडत्या कलाकारांसाठी देखील प्रेक्षक आपले मत नोंदवू शकतात.

फेव्हरेट चित्रपट
येरे येरे पैसा
फर्जंद
बॉईज २
नाळ
मुळशी पॅटर्न
बबन

फेव्हरेट अभिनेता
सुबोध भावे - पुष्पक विमान
पार्थ भावेराव - बॉईज २
श्रीनिवास पोकळे - नाळ
ओम भुतकर - मुळशी पॅटर्न
भाऊसाहेब शिंदे - बबन

फेव्हरेट अभिनेत्री
माधुरी दीक्षित - बकेट लिस्ट
तेजस्विनी पंडित - येरे येरे पैसा
सोनाली कुलकर्णी - गुलाबजाम
कल्याणी मुळे - न्यूड
देविका दफ्तारदार - नाळ
मृण्मयी देशपांडे - फर्जंद

फेव्हरेट दिर्ग्दर्शक
संजय जाधव - येरे येरे पैसा
दिगपाल लांजेकर - फर्जंद
विशाल देवरूखकर - बॉईज २
सुधाकर रेड्डी यक्कनती - नाळ
प्रवीण तरडे - मुळशी पॅटर्न
भाऊराव कऱ्हाडे - बबन

फेव्हरेट सहाय्यक अभिनेता
दिलीप प्रभावळकर - दशक्रिया
सिद्धार्थ जाधव - येरे येरे पैसा
संजय नार्वेकर - येरे येरे पैसा
नागराज मंजुळे - नाळ
उपेंद्र लिमये - मुळशी पॅटर्न
मोहन जोशी - पुष्पक विमान

फेव्हरेट सहाय्यक अभिनेत्री
छाया कदम - न्यूड
गौरी किरण - पुष्पक विमान
मृणाल कुलकर्णी - येरे येरे पैसा
स्पृहा जोशी - होम स्वीट होम
मुक्ता बर्वे - आम्ही दोघी
विशाखा सुभेदार - येरे येरे पैसा

फेव्हरेट खलनायक
प्रवीण तरडे - मुळशी पॅटर्न
देवेंद्र गायकवाड - बबन
मनोज जोशी - दशक्रिया
ओंकार भोजने - बॉईज २

फेव्हरेट गायक
प्रवीण कुवर - टायटल ट्रॅक (येरे येरे पैसा)
जयस कुमार - जाऊ दे न व (नाळ)
आदर्श शिंदे - अरारारा (मुळशी पॅटर्न)
अजय गोगावले - देवाक काळजी रे (रेडू)
आदर्श शिंदे, रोहित राऊत - गोटी सोडा (बॉईज २)
अवधूत गुप्ते - ऊन ऊन (मुळशी पॅटर्न)

फेव्हरेट गायिका
जान्हवी प्रभू अरोरा - टायटल ट्रॅक (येरे येरे पैसा)
वैशाली म्हाडे - ऊन ऊन (मुळशी पॅटर्न)
वैशाली सामंत - खंडाळा घाट (येरे येरे पैसा)
श्रेया घोषाल, साधना सरगम - होऊन जाऊ द्या (बकेट लिस्ट)
वैशाली म्हाडे - वेगळ्या वाटा (आम्ही दोघी)
अंकिता जोशी, आनंदी जोशी - हे दरवळत (नाळ)

फेव्हरेट स्टाईल आयकॉन
अंकुश चौधरी
अमेय वाघ
ललित प्रभाकर
सिद्धार्थ चांदेकर
उमेश कामात
स्वप्नील जोशी

फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर
सई ताम्हणकर
मिथिला पालकर
मृणाल ठाकूर
वैदेही परशुरामी
सोनाली कुलकर्णी
मृण्मयी देशपांडे

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१८ हे पुरस्कार सर्व नवोदित कलाकार तसेच पडद्यामागील कलाकारांना पुरस्कृत करतील. चमकदार पुरस्कार सोहळ्याची संध्याकाळ, ग्लॅमर्स सिनेतारकांचे अफलातूनपरफॉर्मन्स आणि विनोदवीरांची मैफिल या सर्व गोष्टी प्रेक्षक अनुभवातील महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१८ मध्ये. प्रेक्षक नक्कीच या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत यात शंकाच नाही.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement