Latest News
Typography

'H2O' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून अवघ्या महाराष्ट्रात या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून श्रमदानाचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला उन्हाळाच्या झळा बसत असतानाच, त्याची तमा न बाळगता 'H2O' चित्रपटातील सर्व कलाकारांनी 'पाणी फाऊंडेशन' अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील तिसी गावात सुरु असलेल्या श्रमदान शिबिरात उत्साहाने सहभाग घेत, तरुणांसमोर नवीन आदर्श ठेवला आहे.

Supreet Nikam, Director Milind Patil, Ashok N. D., Kiran Patil, Sheetal Ahirrao

H2O Artists Shramadan 02

चित्रपटातही या कलाकारांनी एकत्र येऊन, श्रमदान करून प्रेक्षकांना एक सामाजिक संदेश दिला आहे. मात्र हा संदेश फक्त चित्रपटापुरता मर्यादित न ठेवता कलाकारांनी प्रत्यक्षातही अंमलात आणला. या चित्रपटाच्या माध्यमातून पाण्यासारख्या भीषण समस्येचे गांभीर्य कळल्याचे चित्रपटातील कलाकार आवर्जून सांगतात. सुनील झवर निर्मित आणि मिलिंद पाटील दिग्दर्शित या चित्रपटात अशोक एन. डी., शीतल अहिरराव, धनंजय धुमाळ, सुप्रित निकम आणि किरण पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

H2O Artists Shramadan 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement