'दिल दोस्ती दुनियादारी' या लोकप्रिय मालिकेतील 'निशा' आठवतेय का? राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली ही निशा, म्हणजेच मंजिरी पुपाला लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

‘लय भारी’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडदयावर झळकलेली ग्लॅमरस अभिनेत्री आदिती पोहनकर ‘लय भारी’ चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीत फारशी दिसली नाही. या चित्रपटानंतर गायब झालेली आदिती पोहनकर आगामी कोणत्या चित्रपटातून झळकणार याविषयी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आदितीच्या चाहत्यांची ही उत्सुकता आणि प्रतिक्षा आता लवकरच संपणार असून लय भारी या मराठी चित्रपटानंतर दक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर तब्बल चार वर्षांनी अदिती  ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून मराठी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. २४ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘ट्रकभर स्वप्नं’ या मराठी चित्रपटात ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा.लि प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद पवार यांनी केले आहे.

चॉकलेट बॉय अशी इमेज असलेल्या अनिकेत विश्वासराव आणि ब्युटिफुल स्नेहा चव्हाणला त्यांच्या साखरपुड्यानंतर सिल्व्हर स्क्रिनवर पहिल्यांदाच पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत ‘हृदयात समथिंग समथिंग’ ह्या मराठी सिनेमातून स्नेहा चव्हाण आणि अनिकेत विश्वासराव दिसणार आहेत.

दर्जेदार अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत लौकिक प्राप्त करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रिमा. सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर त्यांनी अल्पावधीतच सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. मराठी – हिंदी नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच माध्यमात त्यांनी आपल्या अभिनयाचा अमिट ठसा उमटविला. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या. गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्या आपल्या मधून निघून गेल्या तरी त्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. रिमा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत ‘होम स्वीट होम’ या चित्रपटातून, या चित्रपटाचे दिग्दर्शन लेखक, अभिनेते हृषीकेश जोशी यांनी केले आहे.

मराठी चित्रपट हा त्याच्या वेगळ्या आशय-विषयांमुळे ओळखला जातो. स्वतच्या जिद्दीनं स्थान मिळवणारे, यश मिळवणारे अनेकजण असतात. त्यांची धडाडी इतरांना प्रेरणादायी असते. अशाच एका जिद्दीची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न आगामी ‘पाटील’ या मराठी चित्रपटातून केला जाणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात संपन्न झाला. श्री. श्रीकांत भारतीय, ओमप्रकाश शेट्ये (मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी) ‘परिंदा’, ‘वास्तव’ यांसारख्या हिंदी चित्रपटांचे लेखक इम्तियाज हुसेन, आमदार हेमंत पाटील, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील या सारखे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच चित्रपटातील कलाकार याप्रसंगी उपस्थित होते. येत्या २६ ऑक्टोबरला ‘पाटील’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बॉलीवूड थीमपार्क' म्हणून नावारूपास आलेल्या कर्जत येथील एन.डी.स्टुडियोचे वलय दिवसागणिक वाढत चालले आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून सादर झालेल्या एन.डी.स्टुडियोच्या भव्य आवारात उभे असलेल्या बॉलीवूड थीमपार्कमध्ये पर्यटकांची नांदी पहावयास मिळत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा खजाना असणाऱ्या याच स्टुडियोमध्ये आता, अभिनयाची कार्यशाळादेखील भरवण्यात येणार आहे.

Advertisement