एखादा चित्रपट यशस्वी करण्यासाठी कलाकार जीवतोड मेहनत घेत असतात. त्यांच्या व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणण्यासाठी हरप्रकारे काम करण्यास ते तयार असतात. याचे आताचे उत्तम उदाहरण म्हणजे भाऊ कदम यांचा आगामी ‘नशीबवान’ चित्रपट. या चित्रपटामध्ये भाऊ सफाई कर्मचाऱ्याची भूमिका साकारत आहेत. ही भूमिका खरी वाटावी, म्हणून भाऊ यांनी खरोखरच कचरा उचलून साफसफाई केली आहे. यात दिग्दर्शकाने कोणत्याही प्रकारची तडजोड न करता सफाई कामगार उचलतात तोच कचरा भाऊंना उचलण्यास सांगितले तसेच सार्वजनिक स्वछतागृहाची सफाई देखील करायला लावली.

केतन भाई सोमैय्या आणि जय केतन भाई सोमैय्या निर्मित “नाशिकचा मी अशिक" हे नाशिकची गाथा सांगणारं नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्याचा टिझर नुकताच लॉन्च झाला असून त्याचा व्हिडीओ आत्तापर्यंत ६८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पहिला आहे आणि येत्या काळात हि संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. सोशल मिडियावरही या टिझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. यावरूनच या गाण्याची क्रेझ लक्षात येते. या गाण्यासाठी प्रसिद्ध गायक प्रवीण कुवर आणि हर्षवर्धन वावरे यांनी आवाज दिला असून दिग्दर्शन प्रसाद आप्पा तारकर यांनी केले आहे.

एका प्रादेशिक भाषेतील चित्रपटाचा रिमेक दुस-या प्रादेशिक भाषेत होणे हे कौतुकाचं आहे कारण यामुळे एखादी सुंदर, मनोरंजक आणि वेगळेपण जपणारी कलाकृती अथवा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यास सोपे होते. मल्याळम भाषेत सुपरहिट ठरलेल्या ‘अंगमली डायरीझ’ या चित्रपटाचा मराठी रिमेक बनवण्यात आला आहे. ‘कोल्हापूर डायरीझ’ या मराठी रिमेक मधील अभिनेता भूषण नानासाहेब पाटीलच्या लूकची झलक डिजीटल मिडीयाच्या माध्यमातून नुकतीच दाखवण्यात आली आहे. अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘कोल्हापूर डायरीझ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जो राजन यांनी केले आहे.

मराठीची सुपरनायिका अमृता खानविलकरसाठी यंदाचे वर्ष खूप खास गेलं आहे. हिंदीतील 'राझी', 'सत्यमेव जयते' हे सुपरहिट चित्रपट आणि 'डेमेज्ड' या वेबसिरीजमुळे तिला बॉलिवूडमध्ये नवी ओळख प्राप्त झाली आहे. अमृताच्या या यशस्वी वाटचालीमध्ये तिच्या चाहत्यांनी देखील मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे, या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी यंदाचा वाढदिवस, अमृताने खास आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला. सांताक्रूझ येथील ताज हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बर्थ डे पार्टीचा तिच्या चाहत्यांनी मनमुराद आनंद लुटला. या पार्टीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रसारवाहिन्या आणि वृत्तपत्र या माध्यमांऐवजी पहिल्यांदाच डिजिटल माध्यमांना इतक्या मोठ्या प्रमाणात महत्व देण्यात आले होते. चाहत्यांपर्यंत सर्वात जलद पोहोचणाऱ्या या डिजिटल माध्यमांसोबत अमृताने स्पेशल मीट अँड ग्रीटसाठी खास वेळ काढला.

कलेप्रती निष्ठा आणि समर्पित भाव असेल तरच तो कलाकार स्वतःच ध्येय साध्य करू शकतो, पण त्याला जोड लागते अथक प्रयत्न, जिद्द आणि आत्मविश्वासाची. अर्थात स्वप्नपूर्तीचा हा प्रवास सोपा कधीच नसतो. आत्मविश्वासाच्या बळावर भावनांची निरगाठ सोडवत स्वप्नं कशी साकार करायची हे सांगू पहाणारा ‘तू तिथे असावे’ हा मराठी चित्रपट येत्या ७ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

प्रेम जरी आयुष्यावर असलं तरी त्याची परिभाषा ही वयोगटानुसार वेगळी असते आणि अनिरुध्द दातेची तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा हे सर्व आपण 'लव्ह यु जिंदगी' या मराठी चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहिले आहे. टीझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद देखील दिला होता. पण प्रेक्षकांच्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम हटके आणि इंटरेस्टिंग करण्यासाठी हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Advertisement