गेली कित्येक वर्ष आपण ऐकत असलेली ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही म्हण राघव स्वप्नील जोशीसाठी अगदी तंतोतंत लागू झाली आहे. न्यू जॉन्सन अँड जॉन्सन च्या नुकत्याच लाँच झालेल्या जाहीरातीतून राघव प्रेक्षकांसमोर आला आहे.

संजय जाधव ह्यांनी आपल्या लकी सिनेमाची घोषणा केल्यावर त्यामधले कलाकार कोण असतील ह्याविषयी गेले कित्येक दिवस सिनेसृष्टीत उत्सुकता होती. सई ताम्हणकर, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिध्दार्थ जाधव, स्पृहा जोशी, श्रेया बुगडे, सोनाली खरे ह्या कलाकारांनी तेच ‘लकी’ असल्याचे जाहिर केले.

सध्या सोशल मीडियावर संजय जाधव ह्यांच्या लकी सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे. गेले एक आठवडा ‘लकी’ सिनेमा सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. ह्याचे मुख्य कारण आहे, ह्या सिनेमाची स्टारकास्ट.

गायक अजय गोगावले यांनी आपल्या खास शैलीतील गायकीने रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी अनेक दर्जेदार गाणी गायली आहेत. त्यांच्या गायकीचा खास पारंपारिक भारतीय संगीताचा लहेजा आहे, मात्र घर आणि घरातील नात्यांचा गोडवा विषद करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटात त्यांनी चक्क एक वेस्टर्न बाजाचे गाणे गात आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. या गाण्याचे संगीत संतोष मुळेकर यांचे आहे. ‘होम स्वीट होम’ ची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. यांची असून प्रोऍक्टिव्ह व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मीडिया प्रस्तुतकर्ते आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृषीकेश जोशी यांनी केले आहे.

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत प्रेम, लग्न, प्रेमविवाह या विषयांवर आधारित बरेच चित्रपट येत आहेत. या विषयांचा वेगवेगळ्या कोनातून विचार चित्रपटांतून केला जातो. या चित्रपटांच्या गर्दीत अरेंज मॅरेजकडे लक्ष वेधत अरेंज मॅरेजचं मनोरंजक पद्धतीने चित्रण 'तुझं माझं अॅरेज मॅरेज' या चित्रपटातून केलं जाणार आहे. दिनेश विजय शिरोडे या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत.

सध्या चित्रपटसृष्टीत नव्या विचारांचे, शैलीचे युवा दिग्दर्शक येतायेत. वेगळ्या वाटेने जाऊ पाहणाऱ्या या दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे आदित्य मोहिते. गेली तीन वर्षे हॉलीवूड मध्ये दिग्दर्शक व कलादिग्दर्शक म्हणून कार्यरत असणाऱ्या आदित्य यांची नाळ महाराष्ट्राशी जोडलेली आहे. वास्तूविशारद असलेले आदित्य पुण्यात वास्तव्यास होते. लहानपणापासून कलेची आवड असणाऱ्या आदित्य यांना कॅमेराच्या माध्यमातून आपल्या मनातल्या कथा अधिक प्रभावीपणे सांगता येऊ शकतात हे लक्षात आल्यानंतर त्यांनी अमेरिका गाठली आणि लॉस एंजलिस येथे फिल्ममेकिंगचं रीतसर प्रशिक्षण घेतलं.

Advertisement