समाजात काय घडतंय हे सिनेमातून दाखवलं जातं. आपल्याकडे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर नेहमीच चर्चा सुरु असतात. श्रद्धेचा गैरवापर करून त्याच बाजारीकरण करणा-या प्रवृत्तींवर प्रहार करणारा फांदी हा चित्रपट २७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ध्वज क्रिएशनची’ प्रस्तुती असलेल्या ‘फांदी’ या चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनापर्यंतची जबाबदारी अजित साबळे यांनी सांभाळली आहे.

मुंबई ... सात बेटांची पसरलेली मायावी नगरी. हिने प्रत्येकाला आपल्यात सामावून घेतलं आहे! या नगरीची खासियत म्हणजे एका बाजूला गगनचुंबी इमारती तर दुसरीकडे अजगरासारखी पसरलेली इथली झोपडपट्टी. मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी अर्थात धारावी..!! अगदी सामान्य माणसापासून, नगरसेवकापासून ते थेट मंत्र्यांपर्यंत साऱ्यांचाच रस या झोपडपट्टीत आहे. या झोपडपट्टीत राहतात अनेक जातीधर्माचे लोक!! त्यातूनच हाणामारी, मारामारी, वाद होत असतात. हे वाद इथलेच लोकलभाई अर्थात झोपडपट्टीदादा सोडवतात. अगदी लहान वयात इथल्या मुलांना याची सवय लागते. त्यातून गुंडगिरी, भाईगिरी जन्माला येते. अशाच एका झोपडपट्टीतील सात बालगुन्हेगारांची कथा उलगडून दाखवणारा ‘पटरी बॉईज’ हा मराठी चित्रपट १९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘श्रीरंगलेखा एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती वेंकटवर्धन नरसिंहन आएंगर, श्रीधर आएंगर, अश्विन भराडे यांनी केली असून दिग्दर्शन अजित साबळे आणि मनोज येरूणकर यांनी केले आहे.

२०१८ हे वर्ष अतिशय खास ठरलेल्या अभिनेत्री अमृता खानविलकरचा या वर्षातील प्रवास अमृताच्या उत्तम अभिनय, नटखट अदा आणि गोड हास्यामुळे अनेकांच्या स्मरणात एक ताजी आठवण म्हणून राहिला आहे आणि पुढेही राहील. अमृता नेहमीच एकापेक्षा एक दमदार पात्र साकारुन प्रेक्षकांना सरप्राईज करत आहे. ज्याप्रमाणे कथेत नाविन्य असतं त्याचप्रमाणे अमृताने साकारलेल्या प्रत्येक पात्राची छटा ही जरा वेगळी असते आणि यानिमित्तानेच अमृताला विविध रुपात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते.

रिंकू राजगुरूची मुख्य भूमिका असलेल्या कागर या चित्रपटाची सध्या चित्रपटसृष्टीत उत्सुकता आहे. कारण, सोशल मीडियावर या चित्रपटातील गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, या व्हिडिओमध्ये रिंकूच्या दिलखेचक अदा पहायला मिळत आहेत. या व्हिडिओतून बऱ्याच काळानंतर रिंकू प्रेक्षकांसमोर आली आहे.

राष्ट्रीय आणि जागतिक व्यासपीठावर मराठी माणसांची शक्ती स्थापन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची कथा अलौकीक आणि अमर आहे. उत्कृष्ट व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय रोमांचक आहे. नम्र सुरुवातीपासून चालत आलेला त्यांचा जीवन प्रवास सामान्य लोकांचा असामान्य आवाज बनून जगभरात गर्जला.

कथा, निर्मिती, दिग्दर्शन यात सरस असणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हमखास यशस्वी होतात. ‘कोंडाजी फर्जंद’ या योद्धयाने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत पन्हाळ्यावर केलेल्या अतुलनीय शौर्याची यशोगाथा सांगणारा ‘फर्जंद’ चित्रपट १ जूनला प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. दिग्दर्शकीय कौशल्याला मिळालेली कलाकारांची उत्तम साथ आणि निर्मात्यांनी केलेल्या अफलातून मार्केटिंग मुळे या चित्रपटाने आपले यशस्वी ५० दिवस पूर्ण केले आहेत. १ जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सलग सातव्या आठवड्यातही प्रेक्षकांची चांगली दाद मिळत आहे. केवळ मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्ट्रभरातील सिंगल स्क्रीन व मल्टीप्लेक्समध्ये ‘फर्जंद’ चित्रपट आज ८ व्या आठवड्यातही उत्तम प्रतिसादात सुरु असून ही मराठी चित्रपटासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

Advertisement