धकधक गर्ल माधुरी दीक्षित चं बकेट लिस्ट च्या निमित्ताने मराठीत पडणारं पहिलं पाऊल... या तिच्या सुरू होणाऱ्या नव्या प्रवासात तिची सोबत करायला अवघा महाराष्ट्र आतूर आहे. कधी एकदा आपण आपल्या लाडक्या हास्यसम्राज्ञीचं मराठमोळं स्वरूप मोठ्या पडद्यावर पाहतो यासाठी प्रेक्षकांमध्ये भलतीच उत्सुकता पाहायला मिळते आहे. याच उत्सुकतेपोटी होणाऱ्या तिकीट विक्रीच्या विचारणेला दाद देत महाराष्ट्रातल्या काही सिनेमागृहांनी प्री-बुकींग सुरू केलं असून प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद या पुढाकाराला मिळतो आहे.

आजकाल रुपेरी पडद्यावर मराठी चित्रपटांसाठी वेगवेगळ्या धाटणीचे विषय हाताळले जात आहे. असाच एक वेगळा विषय ‘राजा’ चित्रपटातून आपल्यासमोर येत आहे. आयुष्यात प्रत्येकजण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपडत असतो. वाटेत येणाऱ्या अडीअडचणींना पार करीत यशापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असतो. याच धडपडीची कथा दाखवताना प्रेमाची गोष्ट उलगडणारा राजा हा संगीतमय चित्रपट २५ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘सत्यसाई मल्टीमिडीया प्रा.लि’ चे निर्माते प्रवीण काकड यांनी या चित्रपटाची निर्मीती केली असून दिग्दर्शन शशिकांत देशपांडे यांचे आहे.

‘मुंबई पुणे मुंबई’ हा चित्रपट बरोब्बर आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरडूपर हिट ठरला. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ दोन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आताही ही यशोगाथा पुन्हा लिहिली जाणार आहे. चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली (52 फ्रायडे सिनेमाज) आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई’च्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही हिट जोडी या तिसऱ्या भागातही दिसणार आहे. या घोषणेच्या वेळी हे दोघेही हजर होते. २८ सप्टेंबर २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून काल राजेश शृंगारपुरे घराबाहेर पडला. त्याचे बाहेर जाण्याचे दु:ख काही सदस्यांना झाले, त्यांनी ते व्यक्त देखील केले. आता नवा आठवडा सुरु झाला आहे, त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रियेला आज सुरुवात होणार आहे. आजची नॉमिनेशन प्रक्रिया जरा वेगळी असणार आहे. कारण घरामध्ये भरणार आहे ग्रामसभा. ज्यामध्ये मेघाचे म्हणणे ठरले कि, बहुमताने जर नॉमिनेशन ठरवले तर आऊ, मी, सई आणि पुष्कर आम्ही सगळेच नॉमिनेशनमध्ये येऊ. तेंव्हा आज कोण नॉमिनेट होणार ? हे बघायला विसरू नका बिग बॉस मराठीमध्ये आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

This video is proof that Madhuri is still a teenager at heart who jumps up to dance when her favourite song plays in the club. Recently, when Madhuri Dixit and Renuka Shahane were shooting for their upcoming film Bucket List, someone from the crew dropped the track ‘Lo Chali Main’ from the film ‘Hum Aapke Hain Koun...!’ and Madhuri and Renuka jumped up and started dancing to the track. Their chemistry In this video is adorable and will take you back in times when the song was released.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी अनेकांनी मोलाचं योगदान दिलं होतं. असंख्य मावळ्यांच्या शौर्याने आणि त्यागाने स्वराज्य स्थापन झाले. यापैकीच एक असलेल्या ‘कोंडाजी फर्जंद’ या शिलेदाराच्या असामान्य शौर्याची कथा ‘फर्जंद’ या आगामी मराठी सिनेमात पहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने इतिहासाच्या पानांमधील आतापर्यंत समोर न आलेल्या अनेक लढवय्या व्यक्तिरेखा समोर येणार आहेत. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ ची प्रस्तुती असलेला ‘फर्जंद’ १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार असून संदीप जाधव, महेश जाऊरकर आणि स्वप्निल पोतदार सहनिर्माते आहेत.

Advertisement