नशीब एखाद्याला कुठे, कसं घेऊन जाईल हे काहीच सांगता येत नाही. हाच अनुभव आला हिमांशू विसाळे या तायक्वांडो खेळाडूला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला हा खेळाडू आता सोबत या चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येत आहे. कश्मिरा फिल्म्स प्रोडक्शन्स निर्मित, गुरुनाथ मिठबावकर यांची प्रस्तुती असलेला "सोबत" हा चित्रपट २५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

स्वप्नांचा प्रवास कधी तो एकट्याचा असतो तर कधी कुणाला सोबत घेऊन. अभिनेता भूषण प्रधान सुद्धा स्वप्नांच्या प्रवासाला निघाला आहे. या प्रवासात अभिनेत्री पल्लवी पाटील त्याच्या सोबत आहे. तू तिथे असावे या आगामी मराठी सिनेमातून भूषण आणि पल्लवीची हळवी प्रेमकथा लवकरच आपल्यासमोर उलगडली जाणार आहे.

विनोदी मल्टीस्टारर्सचा बंपर धमाका घेऊन येणारा ‘वाघेऱ्या’ सिनेमा येत्या १८ मे रोजी सिनेप्रेक्षकांना खळखळून हसवण्यास येत आहे. गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवले यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचा पोस्टर आणि ट्रेलर प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करीत आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर एक गॅागलधारी बकरी आपल्याला पाहायला मिळते. तसेच ‘सांभाळून या राव, येडं झालंय गाव' या टॅॅगलाईनमुळे हा सिनेमा विनोदयुक्त मेजवानीचा परिपूर्ण आनंद प्रेक्षकांना देणार, हे लक्षात येते. तसेच या सिनेमाच्या ट्रेलरमधून एका मागोमाग एक अश्या मातब्बर मराठी विनोदवीरांची फळीदेखील आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे, 'वाघेऱ्या' सिनेमात 'वाघ'असो वा नसो, पण किशोर कदम, भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या विनोदी मल्टीस्टार्सच्या विनोदांची डरकाळी नक्कीच सिनेरसिकांना ऐकू येणार आहे.

डार्विनचा सिद्धांत उलटा होणार, माणसाचं पुन्हा माकड होणार. अशी हटके पंचलाईन असलेल्या धम्म्माल बालचित्रपट ‘मंकी बात’ बद्दल सर्वांच्याच मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. दिग्दर्शक विजू माने यांची ‘मंकी बात’ हि कलाकृती लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामधली खास मेजवानी ठरणार असुन हा चित्रपट येत्या शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

आगामी ‘मस्का’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूरला जात असलेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या फोर्च्युनरला आज सोमवारी सकाळी द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात प्रार्थना बेहेरे हिचा हात फ्रॅक्चर झाला, अनिकेत विश्वासराव सुखरूप आहे तसेच गाडीचे खूप नुकसान झाले. या मोठया संकटातून बाहेर पडत मस्काची टीम "शो मस्ट गो ऑन" या उक्तीला अनुसरून कोल्हापूरकडे रवाना झाली.

आइझॅक न्यूटन, अल्बर्ट आइन्सटाइन, आणि थॉमस एल्वा एडिसन हे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले. ह्या शास्त्रज्ञांना आपल्या नव्या पोस्टर द्वारे 'इपितर' सिनेमाच्या निर्मात्यांनी ट्रिब्यूट दिलेला आहे.

Advertisement