अनेकदा समाजात स्त्रीला एक भोगवस्तू म्हणूनच पाहिलं जातं. लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण आपल्या देशात दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. या भयाण वास्तवाची जाणीव करून देतानाच आपल्या जबाबदारीची जाणीवही करून देणाऱ्या ‘आक्रंदन’ या मराठी चित्रपटाची पहिली झलक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. दिग्दर्शक राजकुमार संतोषी, अल हज हजरत झहीद हुसैन चिश्ती यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते. येत्या ७ सप्टेंबर ला ‘आक्रंदन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भारताच्या इतिहासातील पहिला चित्रपट ’राजा हरिश्चंद्र’ प्रदर्शित झाला. दादासाहेब फाळके यांनी परदेशात जाऊन सिनेमाचे तंत्रज्ञान शिकून भारतात हा चित्रपट तयार केला. त्यावेळेस त्यांना कदाचित कल्पना सुद्धा नसेल की त्यांनी सुरु केलेला हा उद्योगसमूह पुढे जाऊन १०० वर्षांनी १९ हजार ३०० कोटी रुपयांची उलाढाल करेल. गिरगाव येथील कोरोनेशन सिनेमा येथे हा चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांना दाखविला गेला. ४० मिनिटांचा मूक असलेला हा चित्रपट त्याकाळी अवघ्या १० हजारात तयार झाला होता. तर या चित्रपटाने ४७ हजार रुपयांचा गल्ला जमविला होता. फिल्म इंडस्ट्रीच्या भाषेत सांगायचं तर पहिलाच भारतीय चलचित्रपट सुपरहीट ठरला होता.

आपल्या सुमधूर गीतांनी कानसेनांना मोहित करणारी गायिका सावनी रविंद्रने आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. 'टायनी टॉकीज' ह्या युट्यूब चॅनलच्या 'गालिमार' ह्या वेबसीरिज मध्ये तिने नुकतीच एक्टिंग केली आहे.

आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि संजय पाटील निर्मित, पांडुरंग जाधव दिग्दर्शित 'ड्राय डे' या आगामी सिनेमाच्या ट्रेलरने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तरुणाईची मौजमस्ती आणि एका रात्रीची धम्माल गोष्ट सांगणारा हा सिनेमा १३ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 'ड्राय डे' सिनेमाबद्दल सिनेरसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूड स्टार नावाझुद्दीन सिद्धिकीने 'ड्राय डे' सिनेमासाठी अभिनेता ऋत्विक केंद्रेला भरपूर शुभेच्छा दिल्या. तसेच या सिनेमाच्या ट्रेलरची लिंकदेखील त्याने आपल्या ट्वीटरवर पोस्ट केली असल्यामुळे, 'ड्राय डे' बाबत सिनेरसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Remember Sonali Bendre gyrating to the song Chham Chham Karta Hai Ye Nashila Badan from the Marathi film 'Aga Bai Arrechhya'. Life throws unexpected surprises when you least expect it. Sonali Bendre has been diagnosed with cancer and she is currently undergoing treatment in New York. She is 43 years old.

फिल्ममेकर संजय जाधव ह्यांनी सोशल मीडियावरून आपल्या 'लकी' ह्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेल्या 'लकी' सिनेमाचे दिग्दर्शन संजय जाधव करणार आहेत.

Advertisement