बऱ्याचदा चित्रपटाचे कथानक म्हटलं की, काही चांगल्या प्रवृत्ती विरूध्द काही वाईट प्रवृत्तींचा लढा असतो. पण काही कथा सत्य-असत्य, पाप-पुण्याच्या पलिकडच्या असतात. हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपटही योग्य-अयोग्याच्या पल्याडच्या गुढ, रहस्यमयी प्रवासाच्या वाटेवर नेणारा चित्रपट आहे.

कलाकाराला मिळणारा पुरस्कार ही त्याच्या कलेला आणि कार्याला मिळालेली सर्वोत्कृष्ट पावती असते. अंबर भरारी संस्थेच्या वतीने अंबरनाथ फिल्म फेस्टिवल मध्ये कलाकारांचा गुणगौरव करण्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे साई सिनेमा प्रस्तुत, संतोष सोनावडेकर निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘लाल बत्ती’ या चित्रपटाला एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १५ नामांकने या सोहळ्यात मिळाली आहेत.

आशय आणि तंत्राची उत्कृष्ट सांगड घालून दिग्दर्शक समित कक्कड यांनी ‘आयना का बायना’, ‘हाफ तिकीट’ अशा मराठी सिनेमातून आपलं कौशल्य सिद्ध केलेलं आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर मान-सन्मान मिळवून मराठी सिनेमाला जागतिक ओळख मिळवून दिली आहे. नेटफलिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेला मंटोच्या पात्रांवर आधारित ‘आश्चर्य चकीत’ हा बहुचर्चित सिनेमाही सिनेरसिकांच लक्ष वेधून घेतोय आणि समित कक्कडने केलेल्या या धाडसाचे सगळ्यांकडून कौतुक केलं जातंय. असाच एक वेगळ्या विषयावर बेतलेला ’३६ गुण’ हा नवा चित्रपट घेऊन समित कक्कड पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे लंडन मधले चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून समित कक्कड फिल्म्स आणि मोहन नाडर यांच्या बिझी बी प्रोडक्शन्सची निर्मिती असलेला ’३६ गुण’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झी एंटरटेनमेंट एन्टरप्रायजेस लिमिटेडची एकमेव मराठी चित्रपट वाहिनी झी टॉकीज प्रस्तुत सर्वांच्या लाडक्या आणि प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहतात अशा महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१८ या पुरस्कार सोहळ्याचे नामांकन घोषित करण्यात आले आहे. झी टॉकीज प्रस्तुत महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे मराठी सिनेसृष्टीतील एकमेव व्युव्हर्स चॉईस अवॉर्ड्स आहेत. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार नवव्या वर्षात पदार्पण करत असून, या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिली आहे. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कारांसाठी १२ विभागात नामांकन जाहीर झालं असून, ‘फेव्हरेट चित्रपट’, ‘फेव्हरेट अभिनेता’, ‘फेव्हरेट अभिनेत्री’, ‘फेव्हरेट स्टाईल आयकॉन’, ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’, ‘फेव्हरेट गीत’ या प्रसिद्ध विभागात कमालीची टक्कर असणार आहे. मराठी चित्रपट चाहते आजपासून या अद्भुत पुरस्कार सोहळ्यात आपल्या लाडक्या कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी आपले मत २५ जानेवारी पर्यंत नोंदवू शकतात.

सुप्रसिध्द अभिनेत्री सई ताम्हणकरचा फॅनक्लब ‘सईहोलिक्स’ दरवर्षी वर्षाच्या पहिल्या रविवारी सईसोबत एक अनौपचारिक भेट घेत असतो. सईहोलिक्सचे हे गेटटूगेदर सई आणि तिच्या चाहत्यांसाठी वर्षातला सर्वात पहिला मेमोरेबल सोहळा असतो. ज्यात दरवर्षी सईहोलिक्सच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचाही आढावा घेतला जातो. यंदाचं हे चौथं वर्ष आणि ते सईहोलिक्ससाठी आठवणीतलं करण्यासाठी सईने यंदा त्यांना अनोख्या भेटवस्तू दिल्या.

फिल्ममेकर संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर नुकतेच सोशल मीडियावरून रिलीज झाले. पोस्टरमध्ये सिनेमातला मुख्य अभिनेता अभय महाजन निर्वस्त्रपणे कमरेला ट्यूब टायर लावून रस्त्यावरून धावताना दिसतोय. मराठी सिनेमाच्या इतिहासात हिरोचा असा पहिल्यांदाच परिचय होताना दिसत आहे.

Advertisement