‘शुभ लग्न सावधान’ सिनेमामधून एनआरआय रोहनच्या भूमिकेत दिसलेला चॉकलेट हिरो प्रतिक देशमुख आता आपल्या आगामी सिनेमात वेगळ्याच लूकमधून दिसणार आहे. आगामी ‘जजमेंट’ सिनेमात तो यदुनाथ साटम ह्या नैराश्यग्रस्त तरूणाच्या भूमिकेत दिसेल.

चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी आता एकदम नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. ओळखीच्या चेहऱ्याची पुन्हा नव्याने होणारी ही ओळख आहे श्रावणी देवधर यांच्या ‘मोगरा फुलला’ या आगामी चित्रपटातील. चित्रपटाचे निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी ट्विट करत स्वप्निल जोशी साकारत असलेल्या सुनील कुलकर्णीचा हा आगळा लूक प्रेक्षकांसमोर आणला.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती म्हणून आपला दबदबा निर्माण केलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, धगधगता आणि ज्वलंत इतिहास म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे कार्य लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. पुण्यात शिवजयंतीच्या निमित्त निघालेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केली.

‘अशी ही आशिकी’ या सिनेमात दिसणारी हेमल आणि अभिनय या जोडीमधील केमिस्ट्री आता ऑफ स्क्रिनवर पण दिसतेय. मराठी सिनेसृष्टीतील हे नवीन लव्ह बर्ड्स आहेत का असे बोलले जातेय. इतकेच नव्हे तर या सिनेमातील स्वयम आणि अमरजा या ऑन स्क्रिन जोडीची भूमिका साकाराणारे अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे रिअल लाईफमध्ये एकमेकांना डेट तर करत नाहीएत ना... असा प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच आला असेल. कारण ही नवीन जोडी प्रमोशनच्या दरम्यान जरा जास्तच एकत्र रुळली, त्यांच्या हावभावातून ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेस असं कुठेही जाणवत नाही.

झी टॉकीजचा अत्यंत लोकप्रिय असा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा हा कार्यक्रम दहाव्या वर्षात पदार्पण करत असल्याने, या सोहळ्याचे विशेष महत्त्व होते. या वर्षी अनेक प्रसिद्ध मराठी हिंदी सिनेकलाकारांच्या लग्नामुळे हे वर्ष गाजलेलं होते . त्यामुळे सिनेसृष्टीतील २०१८ वर्षातील सिनेकलाकारांची लगीनघाई , त्यावरील मनोरंजन प्रेक्षकांना पाहायला मिळेल . दरवर्षी निरनिराळे आणि आकर्षक थीम घेऊन मनोरंजन करणारा या महासोहळ्यात 'लग्न सराई' .या थीम ची भट्टी चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी चांगलीच जमवली.

आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो'. हेमंत आपटे निर्मित, अजित भुरे दिग्दर्शित या नाटकात संजय मोने आणि मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली आहे. अतिशय परिपक्व संहिता असलेल्या या नाटकाने प्रेक्षकांची वाहवा तर मिळवलीच, याव्यतिरिक्त या नाटकाने नुकताच ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेला 'माझा पुरस्कार'ही पटकावला.

Advertisement