ज्योत्स्ना फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित 'जजमेंट' या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या वेळी चित्रपट कसा घडला, पडद्यामागील किस्से, गमतीजमती यांचा व्हिडीओ सुद्धा लाँच करण्यात आला. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या चित्रपटात तेजश्री प्रधान, मंगेश देसाई, माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या "ऋण" कादंबरीवर आधारित आहे.

राहुल गौतम ओव्हाळ लिखित आणि दिग्दर्शित 'तत्ताड' या आगामी चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मीडियाद्वारे नुकतंच लाँच करण्यात आलं. अत्यंत लक्षवेधी पोस्टर असलेल्या या चित्रपटातून एका वादकाची कथा पहायला मिळणार आहे.

शेतकऱ्यांचा आक्रोश मांडणारा, आणि आजच्या तरुण शेतकरीवर्गाला प्रेरणा देणाऱ्या 'आसूड' सिनेमाला ग्रामीण महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद मिळत आहे. एग्रीकल्चर शाखेत पदवी मिळवलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाला नागपूर, कोल्हापूर, जळगाव यांसारख्या भागातील प्रेक्षकांनी चांगली साथ दिली आहे. खास करून, अभिनेता अमित्रियान पाटीलने साकारलेला 'शिवाजी पाटील' प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. शिवाय, राजकारणी डावपेच आणि हेवेदाव्यांचे चोख विश्लेषण या सिनेमात मांडले असल्याकारणामुळे हा सिनेमा सामान्यांच्या मनात थेट घर करण्यास यशस्वी होत आहे.

साधारण फेब्रुवारी महिना उजाडला की वातावरणाला गुलाबी रंग चढू लागतो. त्यामागचं कारणही तसंच खास आहे. जगभरातील प्रेमी युगुलं ‘व्हॅलेंटाईन्स डे’ साजरा करण्यासाठी सज्ज झालेली असतात. या गोड-गुलाबी रंगाची झलक मराठी चित्रपटात दिसली नाही तर नवलच. ‘रॉकी’ या आगामी मराठी चित्रपटाला एका हळुवार प्रेमकथेची पार्श्वभूमी आहे. अॅक्शन, रोमान्स, ड्रामा आणि इमोशनने परिपूर्ण असलेला ‘रॉकी’ येत्या ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ग्लोबल सिनेमा म्हंटलं की काहीतरी दर्जेदार पहायला मिळणार अशी आपली एक धारणा असते. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जगभरातल्या फिल्म इंडस्ट्रीज मधे हाताळले जाणारे विविध विषय आणि कथा-पटकथा यावर केलं जाणारं प्रचंड काम. दुर्दैवानं आपल्याकडे मात्र फॅमिली ड्रामा, लव्हस्टोरी किंवा अॅक्शन मुव्ही याचाच भडीमार जास्त होताना दिसतो. पण परिस्थिति झपाट्याने बदलतेय.

प्रेमाचा गुलाबी रंग प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. खास करून व्हेलेंटाईन डेच्या दिवशी तर हा रंग खूपच बहरतो. मात्र या रंगाला बट्टा लावणाऱ्या अनेक घटना समाजात घडतात. प्रेमभंग आणि फसवणुकीमुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त होते, त्यामुळेच तर प्रेम करा पण जरा जपून, असंच काहीसं मराठी आणि हिंदी अभिनेत्री रुपाली भोसले आपल्या लघुपटाद्वारे सांगणार आहे. 'हूज नेक्स्ट' या लघुपटाद्वारे ती प्रेक्षकांसमोर येत आहे.

Advertisement