लोकप्रिय मराठी कलाकारांचा समावेश असणाऱ्या महाराष्ट्र सेलिब्रीटी क्रिकेट लीग (MCCL) ला आजपासून ठाण्यात सुरुवात होत आहे. नुकतेच नुतनीकरण करण्यात आलेल्या ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचे या स्पर्धेद्वारे उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार, माध्यम प्रतिनिधी आणि राजकीय नेते यांच्यात रंगणार क्रिकेट सामने रंगणार आहेत. आज {दि. १ फेब्रुवारी) सकाळी ८:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत १०० वादकांच्या ढोलताशाच्या गजरात स्टेडीयमचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून या प्रसंगी आदिवासी नृत्याचे सादरीकरण होणार आहे.

विषयांचे नावीन्य आणि मार्मिक आशयप्रधान मराठी चित्रपटांनी साऱ्यांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित करून घेतल्या आहेत. रसिक-प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या कथा आणि त्याची साजेशी मांडणी असणारे आपले मराठी चित्रपट सर्व स्तरांवर नावाजले जाताना दिसताहेत. असाच एक मानाचा मुजरा 'एक होतं पाणी'च्या निमित्ताने मराठी चित्रपटाला केला गेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तत्कालीन ज्वलंत विषय मांडणारा 'न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज' व 'काव्या ड्रीम मुव्हीज'प्रस्तुत ‘एक होतं पाणी' या चित्रपटाने अलीकडेच अंबरनाथ चित्रपट महोत्सवामध्ये बाजी मारलेली आणि आत्ता ६ व्या नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पुरस्कार पटकावत आपलं महत्त्व अधोरेखित केलं आहे.

सगळीकडेच सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कॉलेजच्या कट्ट्यापासून गावातील चावडीपर्यंत आणि युट्यूब चॅनल पासून वृत्तवाहिन्यांच्या पॅनलपर्यंत सध्या निवडणूक, राजकारण, मतदान, विकास आणि सर्वसामान्यांच्या समस्या यावर जोरदार चर्चा होताना दिसते. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोरंजनाचा एक भक्कम डिजिटल मंच निर्माण करून देणारी भाडिपा अर्थात ‘भारतीय डिजिटल पार्टी’ ही संस्था मागे कशी राहील? गुगलचा न्यूज इनोवेशन फंड प्राप्त करणारी भाडिपा ही आशिया पॅसिफिक मधील एकमेव मनोरंजन संस्था आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर खुमासदार शैलीत टीका करत निखळ विनोदनिर्मिती करणे हा भाडिपाचा यु.एस.पी. आहे. पण आता केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता ‘लोकमंच’ या कार्क्रमाच्या माध्यमातून या संस्थेने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदार आणि राजकीय नेते यांच्यातील संवादाचा दुवा साधण्यासाठी भाडिपाने ‘विषय खोल’ हे नवीन युट्यूब चॅनल सुरु केले आहे.

सशक्त अभिनय, देवदत्त आवाजातली जरब आणि करारी व्यक्तिमत्त्वाने कमालीची लोकप्रियता मिळवणारे उपेंद्र लिमये नेहमीच निरनिराळ्या भूमिकांधून रसिकांचे मनोरंजन करताना दिसतात. प्रत्येक भूमिका आणि त्यानुसार त्याचे उत्कंठावर्धक सादरीकरण ह्यातलं उत्तम गणित उपेंद्र लिमयेंना जमलं आहे. आजवरच्या त्यांच्या विविध भूमिकांमध्ये आणखी एका चॅलेंजिंग पात्राची भर पडली असून लाडे ब्रोज फिल्म्स प्रा.लि. प्रस्तुत 'सूर सपाटा' या आगामी मराठी चित्रपटात आपल्याला ते एका कबड्डी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आपल्याकडे शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षण म्हटले म्हणजे शाळा आली आणि शाळा आली म्हणजे अभ्यास आला. अभ्यास आला म्हणजे परीक्षाही आली. प्रत्येक परीक्षेसाठी मुलं भरपूर अभ्यास करतात आणि एसएससी म्हणजेच १० वी च्या परीक्षेला नेहमीपेक्षा अधिक जोमाने अभ्यास करावा लागतो. १० वी म्हणजे आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ‘शिक्षित’ असा शिक्का बसतो. हल्ली १० वी ला प्रचंड महत्व आले असून विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत ही परीक्षा अत्यंत महत्वाची पायरी समजली जाते. १० वी चे टेन्शन असल्यामुळे मुलांना सतत अभ्यासाला लावणारे पालक सर्वत्र पाहावयास मिळतात. खरंतर ही परीक्षा महत्वाची असली तरी त्यासोबत येणारा मानसिक तणाव पालक आणि पाल्यांच्या मनावर आघात करून जातो हे कितपत योग्य आहे? अशाच मुलांच्या आणि पालकांच्या मनोस्थितीवर भाष्य करणारा एक मराठी चित्रपट येतोय ज्याचे नावही आहे ‘१० वी’.

तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार अनेक राजकीय विषय आजवर चित्रपटांच्या माध्यमातून प्रभावीपणे हाताळण्यात आले आहेत. सरकारी व्यवस्थेतील अनास्थेलाअनेक जण कंटाळलेले असतात. त्या विरोधात आवाज उठवून, प्रसंगी व्यवस्था बदलण्यासाठी, शिकलेला-सवरलेला एक तरुण जेव्हा ‘आसूड’ उगारतो तेव्हा ही व्यवस्था कशी निराधार ठरते हे दाखविणारा ‘आसूड’ हा राजकीयपट ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांचे आहे.

Advertisement