मराठीचा युवा स्टार अभिनेता अमेय वाघ आपल्या चाहत्यांना एका मागून एक आश्चर्याचे धक्के देत आहे. काही दिवसांपूर्वी अमेयने सोशल नेटवर्किंग साईटद्वारे, लवकरच निगेटिव्ह भूमिकेतून झळकणार असल्याची माहिती दिली होती. या बातमीची चर्चा होत असतानाच, त्याने आणखीन एका नव्या प्रोजेक्टबद्दल सांगत त्याच्या चाहत्यांना खुश करून टाकलं आहे.

आपल्या कसदार अभिनयाने, सात्विक सौंदर्याने आणि मनमोहक हास्याने गेली काही दशकं प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारा एक मराठी चेहरा पुन्हा एकदा हिंदी मालिकेच्या पडद्यावर झळकणार आहे. अनेक मराठी सिनेमे आणि नाटकांमधून स्वतःच्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्री ‘निवेदिता सराफ’ कलर्स हिंदी वरील ‘केसरीनंदन’ या मालिकेत ‘रानीदेवी’ या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

महाराष्ट्राचा एनर्जेटिक सुपरस्टार सिध्दार्थ जाधव नेहमीच आपल्या आसपासच्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत असतो. पण ह्या मस्तीखोर आणि मनमौजी अभिनेत्यामागे एक सामाजिक भान असलेला संवेदनशील माणूसही दडलेला आहे, हे त्याने नुकतंच दाखवून दिलंय. नुकत्याच एका कार्यक्रमात सिध्दार्थने बी़डच्या सहारा अनाथालयाच्या निराधार मुलांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलवण्यासाठी धनराशी भेट दिली आहे.

कॉलेज जीवनातलं आयुष्य धमाल असतं. करिअरचा विचार मनात असला तरी बेधुंदी, बेफिक्रीही असते. असेच बेफिकर असलेल्या चार मित्रांची "आम्ही बेफिकर" ही गोष्ट आता प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं नुकतंच सोशल मीडियाद्वारे टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं. ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, पोस्टरवरून हा चित्रपट युथफुल आणि धमाल असल्याची अंदाज बांधता येतो.

सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात एका धमाकेदार पद्धतीने करणार आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील तगड्या स्टारकास्टचा समावेश असलेल्या 'पॉंडिचेरी' या चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांसमोर येणार आहे.

समर्थ अभिनयानं स्वतःची ओळख निर्माण केलेला अभिनेता संदीप कुलकर्णी आता निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. संदीपने स्वतःची करंबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली असून, "डोंबिवली रिटर्न" हा या निर्मिती संस्थेचा पहिला चित्रपट आहे.

Advertisement