प्रितम कागणे हिने आतापर्यंत केलेल्या विविध भूमिका पाहून ती मराठी चित्रपटातील एक आश्वासक चेहरा ठरली आहे, यात शंकाच नाही . प्रितमने 'हलाल' या चित्रपटात अतिशय उत्तम भूमिका साकारली होती, प्रेक्षकांनी त्या भूमिकेत तिला स्विकारलं आणि तिचं कौतुक देखील केलं . प्रितम च्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची गोष्ट आहे, ती म्हणजे प्रितम आता मिलिंद उके यांच्या आगामी 'मान्सून फुटबॉल' या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सागरिका घाटगे, विद्या माळवदे, चित्राशी रावत आणि सीमा आझमी यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार हा प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. हा पुरस्कार मिळावा अशी अनेक सेलेब्सची इच्छा असते. असा हा पुरस्कार मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरला मिळाला आहे. नेहमी पेज-थ्री आणि बॉलीवूड सेलेब्सना मिळणारा हा फॅशन जगतात मानाचा मानला जाणारा पुरस्कार सई ताम्हणकरला मिळणं हे नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.

भाईंबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही आहे. पण मला आत्तापर्यंत ज्या काही मोजक्या चरित्रपट अर्थात बायोपिक भावल्या त्यातील एक म्हणजे रिचर्ड अॅटनबरो यांचा ‘गांधी’. मी हा चित्रपट किमान १५० वेळा पहिला आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये असताना कॉलेजला दांडी मारून हा चित्रपट प्लाझा चित्रपटगृहात एकापाठोपाठ एक असा पहिला. त्या चित्रपटाने मी भारावून गेलो आणि मला वाटते महेश मांजरेकर यांचा 'भाई: व्यक्ती की वल्ली?' हा चित्रपट त्याच तोडीचा होईल. महेश हे पु. ल. आणि प्रेक्षक यांच्यामधील पूल यशस्वीपणे बांधतील, असे उद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी काढले. त्यांच्याच हस्ते सोमवारी सायंकाळी या चित्रपटाचा शुभारंभ वरळी येथे झाला.

प्रत्येकजण कॉलेजविश्वात थोडासा ‘इपितर’ असतो. तरूणपणातला हा ‘इपितर’पणाचं काहीतर नवं करायचं स्फुरण देतं. असेच तीन ‘इपितर’ पुढच्या महिन्यात १३ तारखेला आपल्याला भेटणार आहेत. परश्या, बॉब्या आणि आर्थिंग्याची ही कथा आहे. सिनेमाचे नुकतेच ऑफिशिअल पोस्टर रिलीज झाले आहे.

‘कोंडाजी फर्जंद’ या योद्ध्याने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत पन्हाळ्यावर केलेल्या अतुलनीय शौर्याची यशोगाथा सांगणारा ‘फर्जंद’ चित्रपट १ जूनला प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. या चित्रपटाचा सध्या तिसरा आठवडा सुरु आहे. खरंतर, या आठवड्यात बॉलीवूडचा ‘रेस ३’ हा बडा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला असल्याने, या आठवड्यात एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. विशेष म्हणजे ‘फर्जंद’ चांगली कमाई करत असताना, या हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे काही थिएटरमधून ‘फर्जंद’ चे शो कमी करण्यात आले. थिएटरमधून चित्रपटाचे शो कमी करण्यात आले असताना देखील महाराष्ट्रातील सिंगल स्क्रीन व मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी ठरतो आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

शाळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि निखळ असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवून असतात. ह्या सुंदर नात्यावरचा दोस्तीगिरी हा चित्रपट येत्या २४ ऑगस्टला सिनेमागृहात झळकतो आहे.

Advertisement