अभिनेता म्हणून सर्व प्रकारच्या भूमिका साकारता आल्या पाहिजेत. एकाच साचात न राहता काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रयत्न म्हणून खलनायकी जरी साकारावी लागली तरी चालेल. कोणत्याही अभिनेत्याला खलनायकाची भूमिका साकारताना थोडी तरी भिती वाटत असावी, कारण खलनायक म्हणून प्रेक्षकांकडून त्या अभिनेत्याला नापसंती पण मिळण्याची शक्यता असते. पण आपण एक कलाकार आहोत, त्यामुळे वेगवेगळ्या भूमिकेतून आपले अभिनय कौशल्य दाखवता आले पाहिजेत हे मनाशी पक्कं करुन अभिनेता रोहित कोकाटेने Zee5 च्या ‘डेट विथ सई’ या वेब सिरीजमध्ये ‘हिमांशु’ या पॉश आणि सभ्य व्यक्तिच्या मागे असलेला खरा चेहरा ‘रघुनाथ’ नावाचे खलनायकाचे पात्रं साकारले आहे. ‘डेट विथ सई’मध्ये सईसोबत प्रेक्षकांनाही विश्वास बसेल असा हिमांशु आणि काही क्षणांनंतर खरा स्वभाव दाखवलेला रघुनाथ याची भिती वाटल्याशिवाय राहत नाही, असा दमदार आणि पात्रात शिरुन खरा आणि प्रामाणिक अभिनय रोहितने केला आहे.

अमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’ प्रस्तुत, ‘कृती फिल्म्स’, ‘सोमिल क्रिएशन्स’ निर्मित आणि शेखर ढवळीकर लिखित व जालिंदर कुंभार दिग्दर्शित नवा चित्रपट ‘रेडीमिक्स’ येत्या ८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीच्या अनुभवाचीही एक सुरस कथा सांगताहेत निर्माते प्रशांत घैसास आणि 'चोखंदळ' निर्मितीसाठी अल्पावधीत परिचयाचे झालेले निर्माते सुनील वसंत भोसले. त्यांच्या या निर्मिती अनुभवाचा हा आढावा.

बी लाइव्ह प्रस्तूत "लकी" सिनेमाच्या ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. ह्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते, ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जीतेंद्र आणि डिस्को किंग बप्पी लाहिरी ह्यांची विशेष उपस्थिती. मराठी सिनेसृष्टीतल्या सेलिब्रिटींसोबतच ह्या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला बहार आली.

काही माणसं पॅशनेटली काम करत असतात. हेच पॅशन त्यांच्या प्रत्येक कामाला वेगळा आयाम देत असतो. ‘गोड गुपित’, ‘ना.मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘सुंदर माझं घर’ यासारखे वेगळे चित्रपट देणाऱ्या प्रमोद प्रभुलकर यांनी आजवर दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचे चांगलेच कौतुक झाले आहे. या चित्रपटांच्या यशानंतर ‘युथट्यूब’ हा नवीन चित्रपट १ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शिमगा... कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचं दर्शन घडवणारा हा सण. होळीचा सण म्हणजे मनातलं, दारातलं, घरातील सर्व वाईट, अमंगळ, अभद्र जाळून टाकायचा सण. कोणीही कोणाबद्दल आकस धरू नये, वैर धरू नये, सर्व वाईट विचार या होळीच्या अग्नीत राख करून टाकावेत, अशी महती असणाऱ्या या शिमगोत्सवाची संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस एखाद्या चातकाप्रमाणे वाट पाहात असतो.

'झेब्रा एंटरटेन्मेंट' या निर्मिती संस्थेच्या 'टल्ली' या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त चित्रपट महामंडळाचे' अध्यक्ष मेघराज राजेभोसले व अभिनेते सुशांत शेलार यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. चित्रपट निर्माते एम के धुमाळ, सतीश फुगे, दिग्दर्शक रामकुमार शेडगे, अभिनेते प्रशांत तपस्वी, अनिल नगरकर, किरण रोंगे, विष्णू घोरपडे, राजेश कोरे, एस के पाटील, योगेश कोळी, शिवा भाऊ पासलकर, रविंद्र बेंंडभर या चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली होती. यामध्ये नामांकित कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, निर्माते यांचा समावेश होता.

Advertisement