मदर तेरेसा पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि चार वेळस फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या पद्मश्री डॉ.अनुराधा पौडवाल यांना नुकतंच ब्रिटनच्या संसद सभागृहात इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या वतीने त्यांच्या संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल गौरविण्यात आले आहे. सदर सोहोळ्यास ब्रिटिश ऑल पार्टीचे संसद सदस्य, राजकारणी, एशियन रेडिओ, टीव्ही आणि प्रिंट मीडिया, तसेच यूकेमधील भारतीय संगीत क्षेत्रातील अग्रगण्य प्रतिनिधी उपस्थित होते.

जीवन जगत असताना प्रत्येकालाच कशाची ना कशाची ओढ असते. काही तरी मिळवण्याची इच्छा असते. अशीच काही तरी वेडी इच्छा मनाशी बाळगून एक तरुण आपल्या कॉलेजचा रिसर्च पूर्ण करण्यासाठी निघालेला असतो. या रिसर्चच्या अभ्यासासाठी तो एका डोंगरात अज्ञात स्थळी जातो आणि अडकतो. तेथे त्याला एक वृद्ध भेटतो आणि त्यातुनच पुढे त्यांचे संभाषण सुरु होते. पुढे दोघांची मैत्री होते. तो वृद्ध त्या युवकाला आजच्या लोकांची जगण्याबद्दल असलेली आसक्ती, ओढ आणि मानवी जीवन कसे क्षणभंगुर आहे ते पटवून देतो. आपला शेवट मृत्यूच आहे आणि मृत्यूनंतर देखील आत्मा कशाप्रकारे भटकत रहातो याची जाणीव करून देतो.
इच्छा, अपेक्षांपलिकडे देखील एक जग असते, अशा चिरंतन जगाची ओळख करून देणारी एकांकिका म्हणजे "जाहला सोहळा अनुपम"

सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतीच ‘शुभ लग्न सावधान’ या मराठी चित्रपटाची आकर्षक लग्नपत्रिका अपलोड करण्यात आली.

मैत्रीचा हँँगओव्हर चढवणारा सचिन दरेकर दिग्दर्शित 'पार्टी' हा सिनेमा येत्या २४ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या तरुण कलाकारांना एकत्र आणणाऱ्या या 'पार्टी'चा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँँच करण्यात आला.

अनेकदा समाजात स्त्रीला एक भोगवस्तू म्हणूनच पाहिलं जातं. लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण आपल्या देशात दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. या भयाण वास्तवाची जाणीव करून देतानाच आपल्या जबाबदारीची जाणीवही करून देणाऱ्या ‘आक्रंदन’ या मराठी चित्रपटाची पहिली झलक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. दिग्दर्शक राजकुमार संतोषी, अल हज हजरत झहीद हुसैन चिश्ती यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते. येत्या ७ सप्टेंबर ला ‘आक्रंदन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भारताच्या इतिहासातील पहिला चित्रपट ’राजा हरिश्चंद्र’ प्रदर्शित झाला. दादासाहेब फाळके यांनी परदेशात जाऊन सिनेमाचे तंत्रज्ञान शिकून भारतात हा चित्रपट तयार केला. त्यावेळेस त्यांना कदाचित कल्पना सुद्धा नसेल की त्यांनी सुरु केलेला हा उद्योगसमूह पुढे जाऊन १०० वर्षांनी १९ हजार ३०० कोटी रुपयांची उलाढाल करेल. गिरगाव येथील कोरोनेशन सिनेमा येथे हा चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांना दाखविला गेला. ४० मिनिटांचा मूक असलेला हा चित्रपट त्याकाळी अवघ्या १० हजारात तयार झाला होता. तर या चित्रपटाने ४७ हजार रुपयांचा गल्ला जमविला होता. फिल्म इंडस्ट्रीच्या भाषेत सांगायचं तर पहिलाच भारतीय चलचित्रपट सुपरहीट ठरला होता.

Advertisement